जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीचा दरही वाढला; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीचा दरही वाढला; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीचा दरही वाढला; जाणून घ्या आजचा भाव

भारतीय बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने दरात वाढ झाली आहे. आज दरात वाढ झाली असली, तरी सध्याचा दर 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम खाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारतीय बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने दरात वाढ झाली आहे. आज दरात वाढ झाली असली, तरी सध्याचा दर 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम खाली आहे. दिल्ली सराफा बाजारात 11 जानेवारी 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) 389 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. तर चांदीच्या दरातही आज 1137 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव आज वाढला आहे. सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 389 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नाव भाव 48,866 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा भाव 48,477 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

(वाचा -  मोदी सरकार देतेयं, स्वस्त दरात सोने खरेदीची संधी; जाणून घ्या किंमत )

चांदीचा आजचा दर (Silver Price, 11 January 2021) - सोमवारी चांदीच्या दरातही वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत आज 1,137 रुपये प्रति किलोग्रॅम वाढ झाली. त्यामुळे चांदीचा आजचा भाव 64,726 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. सोने दरातील घसरणीमागे कारण काय? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डॉलरमध्ये वाढीची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे सोने दरात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे.

(वाचा -  भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा,लसीकरण सुरू झाल्यावर आणखी गती येणार;ASSOCHAMचा दावा )

कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आज पुन्हा सोन्यात गुंतवणुक करण्यात आली. त्याचाच परिणाम पुन्हा एकदा आज सोन्याचा दर वाढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात