जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या बँकेच्या गोंधळामुळे एका रात्रीत कॉस्मेटिक कंपनी मालामाल, ट्रान्सफर केले 3,650 कोटी रुपये!

या बँकेच्या गोंधळामुळे एका रात्रीत कॉस्मेटिक कंपनी मालामाल, ट्रान्सफर केले 3,650 कोटी रुपये!

या बँकेच्या गोंधळामुळे एका रात्रीत कॉस्मेटिक कंपनी मालामाल, ट्रान्सफर केले 3,650 कोटी रुपये!

सिटी बँक (Citi Bank) या बँकेच्या एका अधिकाऱ्याने चुकून कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉन (Revlon) ला 3,650 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. आता ही कंपनी ही रक्कम परत देत नाही आहे. हे प्रकरण आता कोर्टात पोहोचलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: कोरोनाच्या संकटकाळात अनेक आर्थिक संकटांचा (Financial Crisis)सामना करावा लागत आहे. अशावेळी एखाद्या कंपनीने छोटी जरी चूक केली तरी ती महागात पडू शकते. अशावेळी बँकिंग क्षेत्रातील एक मोठ्या गोंधळाचा प्रकार समोर आला आहे. सिटीबँकेच्या  एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे कॉस्मेटिक कंपनी रेव्हलॉन (Revlon) ला  3,650 कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत. बँकिंग इतिहासातील सर्वात मोठी चूक Moneycontrol च्या वृत्तानुसार, रेव्हलॉनला सिटीबँकेने चुकून 3,650 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर सिटीबँकेने रेव्हलॉनकडे पैसे परत करण्याची मागणी केली, मात्र कंपनीने रक्कम परत करण्यास नकार दिला आहे. एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे या कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर झालेली रक्कम अद्याप बँक परत मिळवू शकली नाही आहे. त्यामुळे आता ही घटना अमेरिकेच्या कोर्टात (US Court) पोहोचली आहे. कोर्टाने बँकेची चूक बँकिंग इतिहासातील सर्वात मोठी चूक (Historical Mistake)म्हटले आहे. सॉफ्टवेअर एररमुळे ट्रान्सफर झाली रक्कम (हे वाचा- 4,30,00,00,000 रुपये! या किंमतीला विकलं गेलं आशियातील सर्वात महागडं अपार्टमेंट ) सिटीबँकेने ऑगस्ट 2016 मध्ये रेव्हलॉनला 18 लाख डॉलरचे लोन दिले होते. रेव्हलॉनने हे कर्ज एक मोठ्या ब्रँडची खरेदी करण्याासाठी घेतलं होतं. बँकेच्या सॉफ्टवेअर एररमुळे 3650 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. याप्रकरणी सिटीबँकेचे असे म्हणणे आहे की त्यांचे सॉफ्टवेअर आउट ऑफ डेट झाल्यामुळे ही एरर आली होती. हे प्रकरण गेली चार वर्ष कोर्टात चालू होतं. अमेरिकन कोर्टाने बँक क्षेत्रातील ही सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे हे स्पष्ट होतंय की बँकेला 3,650 कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. आरोप पत्यारोप सुरूच सिटी बँकेचे प्रवक्त्यांनी असे म्हटले आहे की, ते कोर्टाच्या निर्णयाशी सहमत नाही आहेत. त्यांच्याकडून हे पैसे परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जाईल, कारण रेव्हलॉनला ही रक्कम एका चुकीमुळे ट्रान्सफर झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात