मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price: सोने-चांदी दरात 13000 रुपयांहून अधिक घसरण; पाहा किंमती आणखी किती कमी-जास्त होणार

Gold Price: सोने-चांदी दरात 13000 रुपयांहून अधिक घसरण; पाहा किंमती आणखी किती कमी-जास्त होणार

जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान जोर पकडत आहे, तसं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यांयांकडे वळत आहेत. त्यामुळे सोने दरात घसरण झाली आहे. परंतु ही स्थिती अधिक काळापर्यंत राहिल अशी शक्यता जाणकारांना वाटत नाही.

जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान जोर पकडत आहे, तसं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यांयांकडे वळत आहेत. त्यामुळे सोने दरात घसरण झाली आहे. परंतु ही स्थिती अधिक काळापर्यंत राहिल अशी शक्यता जाणकारांना वाटत नाही.

जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान जोर पकडत आहे, तसं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यांयांकडे वळत आहेत. त्यामुळे सोने दरात घसरण झाली आहे. परंतु ही स्थिती अधिक काळापर्यंत राहिल अशी शक्यता जाणकारांना वाटत नाही.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 7 मार्च : जगभरात, खासकरून भारतात सोन्याला कठिण परिस्थिती सर्वात फायदेशीर, मदतशीर मानलं जातं. कोरोना काळात अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचं वातावरण असाताना सोन्याने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून दिली. दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Prices) 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहचले होते.

7 ऑगस्ट 2020 च्या सर्वोच्च दरावरून शुक्रवारी 5 मार्च 2021 पर्यंत सोन्याच्या किंमतीत 13,121 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. 5 मार्च 2021 रोजी सोन्याचा दर 43,887 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

चांदीचा दर 7 ऑगस्ट 2020 रोजी 77,840 रुपये प्रति किलोग्रॅम होता. तर आता 5 मार्च 2021 रोजी चांदीचा दर 13,035 रुपयांनी कमी होऊन 64,805 रुपयांवर आला आहे.

या वर्षात सोनं 63 हजार रुपयांवर जाण्याची जाण्याची शक्यता -

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान जोर पकडत आहे, तसं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यांयांकडे वळत आहेत. त्यामुळे सोने दरात घसरण झाली आहे. परंतु ही स्थिती अधिक काळापर्यंत राहिल अशी शक्यता जाणकारांना वाटत नाही. जगभरातील शेअर बाजारांसह इंडियन स्टॉक एक्सचेंजनेही जोर पकडला आहे. शेअर बाजार वाढत असताना त्याच्या नफ्यासह जोखीमही वाढत असते. अशात गुंतवणुकदार पुन्हा एकदा सर्वात सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करतील. त्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

(वाचा - स्वस्त दरातील औषधांसह, रोजगाराच्या संधीही उपलब्ध; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन)

जाणकारांचं म्हणणं आहे की, 2021 मध्ये सोन्याचे दर वाढणार आहेत. असा अंदाज आहे की, सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63000 रुपयांपर्यंत पोहचू शकतात.

सध्याच्या किंमतीवर दीर्घ मुदतीत मोठ्या नफ्याची शक्यता -

सध्याच्या किंमतीवर सोन्याची गुंतवणूक करणं सुरक्षित आहे की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. यावर जाणकारांनी सांगितलं की, सोन्याच्या किंमती घसरण्यामागे अनेक कारणं आहेत. यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे कोरोना लसीकरणाला आलेली गती, दुसरं म्हणजे नवीन लशींबद्दलच्या चांगल्या बातम्या हेदेखील महत्त्वाचं कारण आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत इतर चलनात मजबूती आल्यानेही सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

(वाचा - LPG Gas Cylinder Subsidy Status:तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येते का?असं तपासा)

कोरोना लसीकरणाचा जोर वाढ असताना आर्थिक व्यवहारांमध्येही वाढ होत आहे. अशात लोक अधिक जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत. यात इक्विटी आणि क्रिप्टोकरेंन्सीसारखे पर्याय सामिल आहेत.

दुसरीकडे सोन्याच्या किंमतीतील घसरण तात्पुरती आणि कमी काळासाठी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. म्हणूनच सध्याच्या किंमतीवर सोन्याची गुंतवणूक करून गुंतवणुकदार चांगला नफा कमावू शकतात.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money, Price hike, The gold