नवी दिल्ली, 7 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) रविवारी भारतातील 7,500 व्या जनऔषधी केंद्राचं (Janaushadhi Kendras) उद्धाटन केलं. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे हे नवं केंद्र देशाला समर्पित केलं. केंद्र सरकारकडून देशातील गरीबांना स्वस्त दरात औषधं उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत 2.5 रुपयांत महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध केले जातात. ही योजना 'सेवा आणि रोजगारा'चं एक माध्यम असून यातून तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करण्यात येतात.
जनऔषधी केंद्रांबाबत अधिकाधिक लोकांना माहिती देण्यासाठी 1 ते 7 मार्च हा आठवडा जनऔषधी आठवडा म्हणून साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी या केंद्रांतून औषधं खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे.
जनऔषधी केंद्राबाबत महत्त्वाच्या गोष्टी -
- लोकांना कमीत किमतीत गुणवत्तापूर्ण औषधं उपलब्ध करुन देणं.
- या केंद्रांमध्ये 50 ते 90 टक्क्यांपर्यंत स्वत दरात औषधं मिळतात.
- या केंद्रातून औषधं खरेदी केल्यानंतर आतापर्यंत एकूण 3,600 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
- 1000 हून अधिक जनऔषधी केंद्र अशी आहेत, जी महिलांद्वारे चालवली जातात.
5 वर्षांपूर्वी झाली या योजनेची सुरुवात -
नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 रोजी, पंतप्रधान जनऔषधी योजनेची घोषणा केली होती. या योजनेत सरकारकडून चांगल्या गुणवत्तेची जेनेरिक (Generic) औषधं बाजारभावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध केली जातात. यासाठी सरकारकडून 'जन औषधी स्टोर' तयार तयार केले असून जेनेरिक औषधं उपलब्ध केली जातात.
मागील वर्षी देशातील 700 जिल्ह्यांमध्ये जनऔषधी केंद्रांचे 6200 आउटलेट सुरू झाले होते. ही केंद्र स्वयंरोजगारासाठी एक चांगली संधी म्हणूनही ओळखली जातात.
जनऔषधी केंद्र (Jan Aushadhi Kendra) कोण सुरू करू शकतं?
कोणताही व्यक्ती किंवा व्यावसायिक, रुग्णालय, स्वयंसेवी संस्था, फार्मासिस्ट, डॉक्टर आणि मेडिकल प्रॅक्टिशनर PMJAY अंतर्गत औषधी केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज करू शकतात. PMJAY अंतर्गत औषध केंद्र उघडण्यासाठी SC, ST आणि दिव्यांग अर्जदारांना 50000 रुपयांपर्यंतची औषधं ऍडव्हान्समध्ये दिली जातात. PMJAY या योजनेत पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्र नावाने औषधांची दुकान सुरू केलं जातं.
किती होईल कमाई -
जेनेरिक मेडिकल स्टोरद्वारे महिन्याला जितक्या औषधांची विक्री होईल, त्याच्या 20 टक्के कमिशनच्या रुपात मिळतील. या हिशोबाने महिन्याला 1 लाख रुपये रुपयांची विक्री केल्यास, त्या महिन्याला 30 हजार रुपयांची कमाई होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Affordable, BJP, Generic medicine, Generic stores, Modi government, Money