• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SBI कडून कोरोना रुग्णांना दिलासा! स्वस्त दरात मिळेल वैयक्तिक कर्ज, वाचा काय आहे योजना

SBI कडून कोरोना रुग्णांना दिलासा! स्वस्त दरात मिळेल वैयक्तिक कर्ज, वाचा काय आहे योजना

कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) कवच पर्सनल लोन (kavach personal loan) ही अनोखी कर्ज योजना दाखल केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जून: कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांसमोर हा आजार झाल्यास उपचाराचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न उभा राहत आहे.ऐनवेळी पैशाची तजवीज कशी करायची ही चिंता अनेकांना सतावते आहे. अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) कवच पर्सनल लोन (kavach personal loan) ही अनोखी कर्ज योजना दाखल केली आहे. लोकांना स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या कोविड-19वरील उपचार खर्चाचा (Covid-19 Treatment) आर्थिक ताण सुसह्य करता यावा यासाठी बँकेनं ही तारणमुक्त (Collateral Free Loan) कर्ज योजना आणली आहे. या अंतर्गत कोणतीही व्यक्ती 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकते. स्वतःचा तसंच कुटुंबीयांचा कोविड उपचारांचा खर्च भागवण्यासाठी हे कर्ज घेता येणार आहे. व्याजदर आणि कालावधी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा (SBI Chairman Dinesh Khara) यांच्या हस्ते ‘कवच वैयक्तिक कर्ज’ ही योजना दाखल करण्यात आली.वैयक्तिक कर्ज (Personal Loan) विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत ग्राहकांना 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी स्वस्त दरात घेता येईल.वार्षिक 8.5 टक्के व्याजदरानं 5 वर्षांसाठी हे कर्ज घेता येणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तीन महिन्यांचा मोराटोरियम कालावधीही (Moratorium Period) देण्यात आला आहे.या कालवधीत कर्जाचा हप्ता जमा न केल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असं ही खारा यांनी स्पष्ट केलं.तसंच या कर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारलं जाणार नाही. बँकेने प्री क्लोजर चार्जेस आणि प्री-पेमेंट पेनल्टीदेखील माफ केली आहे.या कर्जाचा लाभ केवळ कोरोना रुग्ण स्वत:साठी किंवा कुटुंबीयांच्या उपचारासाठी घेऊ शकतात. हे वाचा-IT क्षेत्रात रोजगार कमी झाल्याचा दावा चुकीचा, यावर्षी लाखोंना मिळाल्या नोकऱ्या तारणमुक्त कर्ज   तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य कोविडग्रस्त असल्यास हे कर्ज घेता येते.यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करणं आवश्यक आहे.पगारदार किंवा पगारदार नसलेल्या व्यक्तीही तसंच पेन्शनर व्यक्तीही हे कर्ज घेऊ शकतात. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.हे कर्ज पूर्णपणे तारणमुक्त आहे म्हणजेच या कर्जाच्या बदल्यात, बँककडे काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही.हे एक टर्म लोन किंवा मुदत कर्ज आहे. असा करा अर्ज हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता किंवा स्टेट बँकेच्या योनो अॅपद्वारे ते प्री अप्रूव्ह केले जाऊ शकते. स्टेट बँकेच्या या योजनेमुळे कोविड साथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आणि या आजाराच्या उपचार खर्चाचा भार सोसाव्या लागणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: