नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा देत आहे. तुमचे देखील या बँकेत खाते असेल तर तुम्ही 10 लाखांचा फायदा मिळवू शकता. यासह अनेक ऑफर्सही तुम्हाला मिळतील. जरम्यान बँकेकडून ग्राहकांसाठी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी केले जातात. यापैकी एक आहे ते म्हणजे रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (PNB Rupay Select Credit Card). यामध्ये तुम्हाला शॉपिंगसह हेल्थ चेकअप पॅकेज, अपघाती विमा, डोमेस्किट आणि इंटरनॅशनल लाउंज प्रोग्रॅम यासह कॅशबॅकसह अनेक सुविधा मिळतील. या कार्डवर तुम्हाला 10 लाख रुपयांचा अपघाती विमा (Accidental Insurance of 10 Lakhs Rupees) मिळेल. PNB ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.
PNB ने केलं आहे ट्वीट
पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, पंजाब नॅशनल बँकेच्या रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आनंदाचा अनुभव मिळवा. यामध्ये तुम्हाला खास ऑफर्स आणि सवलतींचा फायदा मिळेल. चेक करा फीचर्स-
Experience the happiness @RuPay Select credit card offers! Check features 👇🏻
For more information, visit: https://t.co/BmszfH0XHr pic.twitter.com/Dor98ea7x3 — Punjab National Bank (@pnbindia) August 23, 2021
रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डमध्ये (Rupay Select Credit Card)काय मिळतील सुविधा?
>> कॉम्प्लिमेंट्री गोल्फ सेशन
>> कॉम्प्लिमेंट्री स्पा सेशन
>> जिम मेंबरशिप
>> हेल्थ चेकअप पॅकेज
>> डोमेस्टिक आणि इंटरनेशनल लाउंज
>> अॅक्सिडेंटल इंश्योरेंस 10 लाखांपर्यंत
तुम्ही अधिक माहितीसाठी https://pnbcard.in/login/types6.html या लिंकवर भेट देऊ शकता.
या कार्डचे खास फीचर्स आणि काय आहे जॉइनिंग फी?
>> मिनिमम जॉइनिंग फीस – 500 रुपये
>> वार्षिक कार्डची फी- NIL (जर एका तिमाहीमध्ये कार्डचा वापर केला गेला तर
>> पहिल्या वापरात 300 हून अधिक रिवॉर्ड पॉइंट्स
>> रिटेल मर्चेंटाइज्डना दुप्पट रिवॉर्ड पॉइंट्स
>>PNB Genie App – वन स्टॉप सॉल्युशन
>> डोमेस्टिक आणि इंटरनेशनल लाउंज प्रोग्रॅम
>> यूटिलिटी बिल आणि रेस्टॉरंटवर एक्सक्लूझिव्ह कॅशबॅक ऑफर्स
>> इन्शुरन्स कव्हरेज
>> 300 हून अधिक मर्चेंट ऑफर्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.