Home /News /money /

Gold price today: आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली; इथे तपासा भाव

Gold price today: आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली; इथे तपासा भाव

भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत (Gold price today) घसरण पाहायला मिळाली आहे. तर आज सोन्यासह चांदीचे दर (Silver price today) देखील कमी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर: भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत (Gold price today) घसरण पाहायला मिळाली आहे. तर आज सोन्यासह चांदीचे दर (Silver price today) देखील कमी झाले आहेत. कमजोर ग्लोबल संकेतांमुळे सोन्याचांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी कमी होत 47,406 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.19 घसरणीसह 65,208 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.17 टक्क्यांनी उतरले होते तर चांदी 0.19 टक्क्यांनी महागली होती. अमेरिकन डॉलरच्या कमजोर समर्थनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,826.75 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 24.76 डॉलर प्रति औंस झाले आहेत. त्याचप्रमाणे प्लॅटिनमच्या दरातही वाढ झाली आहे. प्लॅटिनमचे दर 1,020.26 डॉलर झाले आहेत. हे वाचा-FD बाबत RBI च्या नियमांमध्ये बदल, एक छोटी चूक केली तर होईल मोठं नुकसान! 24 कॅरेट सोन्याचा दर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार देशातील विविध शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. 7 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये सोन्याचा दर 50910 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 47530 रुपये तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर अनुक्रमे 49650 रुपये आणि 48850 रुपये प्रति तोळा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर तर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 46660 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईत 22 कॅरेटचा दर 46530 रुपये प्रति तोळा आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर अनुक्रमे 46950 रुपये आणि 44780 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा-चांगली बातमी! सणासुदीपूर्वी 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या