• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • FD बाबत RBI च्या नियमांमध्ये बदल, एक छोटी चूक केली तर होईल मोठं नुकसान!

FD बाबत RBI च्या नियमांमध्ये बदल, एक छोटी चूक केली तर होईल मोठं नुकसान!

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit - FD) अर्थात मुदत ठेवींच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकाने योग्य ती काळजी घेतली नाही, तर नुकसान होऊ शकतं.

  • Share this:
मुंबई, 7 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit - FD) अर्थात मुदत ठेवींच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकाने योग्य ती काळजी घेतली नाही, तर या नव्या नियमामुळे तीन ते चार टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकतं. आता एफडी करण्यापूर्वी ग्राहकाला आपलं नियोजन व्यवस्थित करावं लागेल. छोटीशी चूक झाली, तरीही ग्राहकांना व्याजदरात मोठं नुकसान सोसावं लागू शकेल. सर्वसाधारणपणे ग्राहकांनी एकदा एफडी केली आणि मॅच्युरिटीच्या (Maturity) वेळी त्यावर क्लेम केला नाही, तर बँकेकडून आपणहून ती एफडी पुन्हा त्याच कालावधीसाठी पुढे वाढवली जाते. आता मात्र नव्या नियमानुसार, तुम्ही बँकेत एफडी केली आणि मॅच्युरिटीच्या वेळी ती क्लेम केली नाही किंवा तिचा कालावधी पुढे वाढवलाही नाही, तर बँकेकडून त्यावर आपणहून कोणतीच कार्यवाही केली जाणार नाही. रिझर्व्ह बँकेने आपल्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट केलं आहे, की जे ग्राहक एफडी करतात आणि मॅच्युरिटीच्या वेळी ती क्लेमही करत नाहीत किंवा तिचा कालावधीही पुढे वाढवत नाहीत, त्यांना त्या एफडीवर सेव्हिंग बँक अकाउंट (Savings Bank Account) अर्थात बचत खात्यातल्या व्याजदराने व्याज दिलं जाणार आहे. बचत खात्याचा व्याजदर सध्या खूपच कमी आहे. हा नवा नियम सर्व कमर्शियल बँक, स्मॉल फायनान्स बँक, सरकारी बँक आणि प्रादेशिक बँकांना लागू होणार आहे. बचत खात्याचा व्याजदर कमी असतो. कोरोनाच्या कालखंडात सर्वच व्याजदरांत कपात झाली. त्यात हा व्याजदर तीन ते चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एफडीच्या व्याजदरांतही कपातच झाली आहे; मात्र एफडी किती कालावधीची करतो, त्यानुसार एफडीचे व्याजदर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असतात. म्हणून बचत खात्यात पैसे पडून राहण्यापेक्षा एफडी करण्याला प्राधान्य दिलं जातं. पूर्वी जेव्हा एफडी मॅच्युअर व्हायची, तेव्हा संबंधित ग्राहकाने त्या एफडीचे पैसे काढून घेतले नाहीत किंवा ती एफडी पुढे चालू ठेवण्यासंदर्भात बँकेला काही सांगितलं नाही, तर बँकेकडून ती एफडी तशीच पुढे चालू ठेवली जाई. त्यामुळे त्या एफडीचा जो व्याजदर असे, तोच पुढेही लागू राही. आता मात्र रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार तसं होणार नाही. ग्राहकाने एफडी मॅच्युरिटीनंतर पैसे काढून घेतले नाहीत किंवा ती पुढे चालू ठेवण्यासंदर्भात बँकेला सूचनाही दिली नाही, तर एफडी मॅच्युरिटीनंतर त्या पैशांवर बचत खात्यातल्या दराप्रमाणे व्याज दिलं जाणार आहे. त्यामुळे एफडी मॅच्युरिटी पीरियड लक्षात ठेवून ग्राहकाने एक तर पैसे काढून घ्यावेत किंवा एफडीचं रिन्यूअल (FD Renewal) करायचं असेल, तर बँकेला तशी सूचना वेळेत देणं गरजेचं आहे. नाही तर मुळातच व्याजदर कमी असताना ग्राहकांना आणखी नुकसान सोसावं लागू शकतं.
First published: