जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: घरी आहे लगीनघाई तर स्वस्तात करा सोनेखरेदी! रेकॉर्ड स्तरापेक्षा 3000 रुपयांनी कमी आहे सोनं

Gold Price Today: घरी आहे लगीनघाई तर स्वस्तात करा सोनेखरेदी! रेकॉर्ड स्तरापेक्षा 3000 रुपयांनी कमी आहे सोनं

Gold Price Today: घरी आहे लगीनघाई तर स्वस्तात करा सोनेखरेदी! रेकॉर्ड स्तरापेक्षा 3000 रुपयांनी कमी आहे सोनं

सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराईचा मौसम सुरू झाला आहे. जर तुमच्या घरात कुणाचे लग्न होत असेल आणि तुम्ही सोने खरेदी करणार असाल (gold rate in wedding season) तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी असू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराईचा मौसम सुरू झाला आहे. जर तुमच्या घरात कुणाचे लग्न होत असेल आणि तुम्ही सोने खरेदी करणार असाल (gold rate in wedding season) तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी असू शकते.जर तुमच्या घरात लग्न आहे आणि तुम्ही सोने खरेदी (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सोने विक्रमी पातळीपासून 3000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ वाढ झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,175 रुपये प्रति तोळावर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव (Silver Price Today) 65,268 रुपये प्रति किलोवर बंद झाला. हे वाचा- IPO मध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान विक्रमी पातळीपेक्षा 3000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं काल सोन्याचा भाव 49 हजारांच्या आसपास होता.  गेल्यावर्षी याच दरम्यान नोव्हेंबरमध्ये 52 हजार रुपयांच्या जवळपास सोन्याचा भाव होता. अशा स्थितीत सोने विक्रमी पातळीपासून 3000 रुपयांनी स्वस्त होत आहे. त्याचबरोबर चांदी विक्रमी पातळीपेक्षा एक हजार रुपयांनी महागली आहे. कशाप्रकारे जाणून घ्याल सोन्याचा भाव? सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा- Paytm च्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पहिल्या दिवशी निराश; पुढे काय करायचं अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात