मराठी बातम्या /बातम्या /मनी /IPO मध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान

IPO मध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान

पेटीएमची (Paytm) ऑपरेटर कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) च्या आयपीओची (IPO) खूप चर्चा झाली होती; मात्र लिस्टिंग झाल्यानंतर त्या शेअरची किंमत घसरली आहे. अनेक गुंतवणूकदारांचं यात नुकसान झालं आहे. तुम्हालाही भविष्यात येणाऱ्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टींची खबरदारी तुम्ही घेणं आवश्यक आहे.

पेटीएमची (Paytm) ऑपरेटर कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) च्या आयपीओची (IPO) खूप चर्चा झाली होती; मात्र लिस्टिंग झाल्यानंतर त्या शेअरची किंमत घसरली आहे. अनेक गुंतवणूकदारांचं यात नुकसान झालं आहे. तुम्हालाही भविष्यात येणाऱ्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टींची खबरदारी तुम्ही घेणं आवश्यक आहे.

पेटीएमची (Paytm) ऑपरेटर कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) च्या आयपीओची (IPO) खूप चर्चा झाली होती; मात्र लिस्टिंग झाल्यानंतर त्या शेअरची किंमत घसरली आहे. अनेक गुंतवणूकदारांचं यात नुकसान झालं आहे. तुम्हालाही भविष्यात येणाऱ्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टींची खबरदारी तुम्ही घेणं आवश्यक आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 19 नोव्हेंबर: पेटीएमची (Paytm) ऑपरेटर कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) च्या आयपीओची (IPO) खूप चर्चा झाली होती; मात्र लिस्टिंग झाल्यानंतर त्या शेअरची किंमत घसरली आहे. लिस्टिंग सोहळ्यात कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) भावूक झाले होते. लिस्टिंग कमी किमतीवर झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले. वास्तविक पाहता कोरोना महामारी असूनही, या वर्षी IPO बाजारात तेजी आहे. पहिल्या सहामाहीत विक्रमी आयपीओ आले आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

    अनेक किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओची प्रतीक्षा आहे. आयपीओमधून फायदा मिळतो हे खरं असलं, तरी त्यात तोट्याचीही मोठी शक्यता असते. अशा परिस्थितीत, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊ या आयपीओ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत…

    हे वाचा-PF खात्यात व्याजाचे पैसे अजूनही नाही झाले क्रेडिट? वाचा कधीपर्यंत होईल हे काम

    आयपीओ म्हणजे काय?

    आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. बाजारातून भांडवल उभारण्यासाठी खासगी कंपनीकडून आयपीओ जारी केला जातो. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, आयपीओ ही खासगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा कंपन्यांना पैशाची गरज असते, तेव्हा ते शेअर मार्केटमध्ये स्वतःला सूचीबद्ध करतात. कंपनी आयपीओद्वारे मिळालेलं भांडवल तिच्या गरजेनुसार खर्च करते. हा फंड कर्ज फेडण्यासाठी किंवा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाऊ शकतो. स्टॉक एक्स्चेंजवर (Stock exchange) शेअर्सची नोंदणी केल्यानं कंपनीला योग्य मूल्यांकन मिळण्यास मदत होते.

    आयपीओ सब्सक्राइब करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

    1. कोणत्याही आयपीओचं सबस्क्रिप्शन घेण्यापूर्वी, एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे, तुम्हाला त्यावर लिस्टिंग गेनचा फायदा घ्यायचा आहे की दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची आहे. काही वेळा काही शेअर्सच्या बाबतीत असं घडतं, की लिस्टिंग गेन (Listing Gain) खूप जास्त असतो; मात्र तो नेहमी तितक्याच तेजीत राहतो असं नाही.

    2. आयपीओ दाखल करताना, आयपीओमधून उभारलेला निधी कसा वापरला जाईल याची माहितीदेखील कंपनी आपल्या प्रॉस्पेक्टसमध्ये देते. कंपनी आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा तिची क्षमता वाढवण्यासाठी निधी उभारत आहे का, यावर लक्ष ठेवा. एखादी कंपनी आपली क्षमता वाढवण्यासाठी निधी उभारत असेल, तर तिचा विस्तार होण्याची शक्यता जास्त असते.

    3. ज्या कंपनीचा आयपीओ ओपन होत आहे, त्यात राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांचा स्टेक असेल तर गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होतात; मात्र गुंतवणुकीचा निर्णय केवळ मोठ्या स्टेक होल्डर्समुळे प्रभावित होऊन घेऊ नये. कंपनीच्या सर्व प्रमोटर्सची आवश्यक ती माहिती गोळा करूनच गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे.

    हे वाचा-Petrol price today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा काय आहे आजचा भाव

    4. आयपीओसाठी कंपनीचं किती मूल्यांकन निश्चित केलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. उद्योगात गुंतलेल्या इतर कंपन्यांशी (पियर्स) त्याची तुलना करणं आवश्यक आहे. ज्या कंपनीचं आयपीओ सबस्क्रिप्शन ऑफर केलं गेलं आहे, तिचं P/E (प्राइस टू अर्निंग) गुणोत्तर, P/B (प्राइस टू बुक) गुणोत्तर आणि कंपनीकडे किती कर्ज आहे (म्हणजे डेट ऑफ अर्निंग) पाहणं आवश्यक आहे. या गोष्टी जितक्या कमी असतील तितकं चांगलं आहे. हे गुणोत्तर काय असावं यासाठी प्रत्येक उद्योगासाठी वेगळं प्रमाण असतं.

    5. अनेक व्यापारी किंवी गुंतवणूकदार आयपीओ सबस्क्राइब करण्यापूर्वी ग्रे मार्केट ट्रेंडदेखील पाहतात. यामुळं आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी निश्चित केलेल्या किमतीवर किती नफा मिळू शकतो याचा अंदाज लावणं शक्य होतं. ही गोष्ट केवळ अल्पकालीन गुंतवणुकीसाठी प्रभावी ठरू शकते. तुम्ही दीर्घ काळ गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर कंपनीच्या मूलभूत तत्त्वांच्या आधारे पुढील निर्णय घ्यावेत.

    First published:

    Tags: Paytm, Share market