Home /News /entertainment /

मुंबईतील महागड्या ठिकाणी टायगर श्रॉफने खरेदी केलं घर; अलिशान घरातून दिसणार अरबी समुद्र

मुंबईतील महागड्या ठिकाणी टायगर श्रॉफने खरेदी केलं घर; अलिशान घरातून दिसणार अरबी समुद्र

मुंबईतील खार वेस्ट (Khar west) येथील अतिशय महागड्या ठिकाणी त्याने हे घर खरेदी केलं आहे.

  मुंबई 24 ऑगस्ट : बॉलिवूडचा स्टंट मॅन आणि प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) मुंबईतील एका अलिशान ठिकाणी घर खरेदी केलं आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी प्रॉपर्टी खरेदी करताना दिसत आहे. त्यात टायगरनेही आता महागडं घर खरेदी केलं आहे. मुंबईतील खार वेस्ट (Khar west) येथील अतिशय महागड्या ठिकाणी त्याने हे घर खरेदी केलं आहे. खार वेस्ट येथील रुस्तमजी पॅरामाउंट येथे त्याने घर घेतलं आहे. हे एक सेफ गेटेड आणि अल्ट्रा एक्सक्लुझिव्ह कम्युनिटी आहे. यात 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 बीएचके अपार्टमेंट्स (BHK apartments) आहेत. टायगरसोबत त्याचे आई वडील जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफ देखील त्याच्यासोबत राहणार आहेत.
  श्रॉफ कुटुंब पूर्वी कार्टर रोड येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होतं. तिथे ते भाड्याने राहत होते. तर आता टायगरने नवीन 8 बेडरुम्सचं घर खरेदी केलं आहे. त्यामुले संपूर्ण कुटुंब आता इथे शिफ्ट होणार आहे. या अपार्टमेंटमध्ये  जिम, गेम रूम, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या अलिशान कॉम्प्लेक्समधून सुंदर अरबी समुद्राचं दर्शनही होतं. त्यामुळे सी फेसिंगचा (Sea facing) आनंद घरातून घेता येणार आहे. याशिवाय अनेक महागड्या सुविधा या कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध आहेत.

  Topless फोटोंनंतर रियाने 'मर्डर मिस्ट्री'साठी पुन्हा धारण केला Bold अवतार

  कॉम्प्लेक्समध्ये एक आउटडुअर फिटनेस जिम, आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग एरिया आहे. इथे एक स्टार-गेजिंग डेक देखील आहे, जो सेलिब्रिटींचा चिल आउट करण्याचा स्पॉट आहे. या कॉम्प्लेक्समध्ये राणी मुखर्जी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मेघना घई पुरी, दिशा पाटनी यांसारख्या सेलब्रिटींनीही घर घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Jackie shroff, Tiger Shroff

  पुढील बातम्या