• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • LPG Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवा प्लॅन, कुणाच्या खात्यात येणार पैसे?

LPG Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवा प्लॅन, कुणाच्या खात्यात येणार पैसे?

LPG cylinder Subsidy- घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या काळात एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना 1000 रुपये प्रति सिलेंडर मोजावे लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: एलपीजी सिलिंडरच्या सब्सिडीबाबत (LPG Gas Cylinder Subsidy) मोठी माहिती समोर येत आहे. सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार (Internal Assessment) एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रति सिलिंडर एक हजार रुपये द्यावे लागतील. मात्र अद्याप सरकारचे यावर काय मत आहे हे पूर्णपणे स्पष्ट नाही. नॉर्थ ब्लॉकमधील उच्चस्तरीय सूत्रांनी सीएनबीसी-टीव्ही 18 ला दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनात असे दिसून आले आहे की एलपीजी सिलिंडरचे ग्राहक प्रति सिलिंडर एक हजार रुपये देण्यास तयार आहेत. सीएनबीसी-टीव्ही 18 च्या बातमीनुसार, सरकारने अनुदानाच्या मुद्द्यावर अनेक वेळा चर्चा केली परंतु अद्याप कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार एलपीजी सिलिंडरबाबत दोन भूमिका घेऊ शकते. एक म्हणजे सरकार अनुदान न देता सिलेंडरचा पुरवठा करू शकते. आणि दुसरं म्हणजे, काही निवडक ग्राहकांना अनुदानाचा दिला जाईल. मात्र, सबसिडी देण्याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले गेले नाही. हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रति तोळाचा दर काय आहे सब्सिडीची स्थिती? 2020 मध्ये जेव्हा कोरोनाव्हायरसमुळे जगभरात लॉकडाउन (Coronavirus Lockdown) लागू करण्यात आला होता, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या. यामुळे एलपीजी सबसिडीसंदर्भात भारत सरकारला मदत झाली कारण किमती कमी होत्या आणि सबसिडीमध्ये बदल करण्याची गरज नव्हती. मे 2020 पासून दुर्गम भाग आणि एलपीजी प्लँटपासून दूर असणारे क्षेत्र वगळता अनेक क्षेत्रात एलपीजी सब्सिडी बंद झाली आहे. हे वाचा-Petrol Price Today: 18व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, मुंबई-पुण्यात पेट्रोल सरकारची काय आहे योजना? सरकार अनुदानाचा विचार करू शकते, परंतु हे स्पष्ट आहे की 10 लाख रुपयांच्या उत्पन्नाचा नियम लागू राहील आणि उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल. उर्वरित लोकांसाठी सब्सिडी समाप्त होऊ शकते. ही योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi has started Ujjwala Gas Yojana) यांनी सुरू केली होती. भारतात 29 कोटींपेक्षा जास्त एलपीजी कनेक्शन आहेत, त्यापैकी उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 8.8 एलपीजी कनेक्शन आहेत. FY22 मध्ये, सरकार योजनेअंतर्गत आणखी एक कोटी जोडणी जोडण्याची योजना आखत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: