Home /News /money /

Petrol Price Today: आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत, वाचा लेटेस्ट दर

Petrol Price Today: आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत, वाचा लेटेस्ट दर

File Photo

File Photo

Petrol Price Today: मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे

    मुंबई, 06 जानेवारी: इंधन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजही पेट्रोल-डिझेलसाठी (Latest Fuel Rates) सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे.अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात शुक्रवारी देखील कोणताही (Petrol Diesel Price on 07th January 2022) बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर (How to Check Petrol and Diesel Price) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-मुलीच्या लग्नासाठी हवाय मोठा फंड? या स्कीममध्ये करा गुंतवणूक इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. महाराष्ट्रातील इंधनाचे दर मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.70 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.48 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.70 रुपये92.48 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक110.40 रुपये93.16 रुपये
    नागपूर109.95 रुपये92.76 रुपये
    अहमदनगर109.96 रुपये92.75 रुपये
    औरंगाबाद110.71 रुपये93.46 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.67 रुपये92.43 रुपये
    परभणी113.19 रुपये95.84 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली109.65 रुपये92.47 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price, Petrol price hike

    पुढील बातम्या