मराठी बातम्या /बातम्या /मनी /IOB Mega E-Auction: पूर्ण करा स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न! ही बँक स्वस्तात विकतेय प्रॉपर्टी

IOB Mega E-Auction: पूर्ण करा स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न! ही बँक स्वस्तात विकतेय प्रॉपर्टी

IOB Mega E-Auction: तुम्ही देखील स्वस्त घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank- IOB) तुम्हाला ही संधी देत आहे. बँकेकडून काही प्रॉपर्टीजचा लिलाव केला जाणार आहे.

IOB Mega E-Auction: तुम्ही देखील स्वस्त घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank- IOB) तुम्हाला ही संधी देत आहे. बँकेकडून काही प्रॉपर्टीजचा लिलाव केला जाणार आहे.

IOB Mega E-Auction: तुम्ही देखील स्वस्त घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank- IOB) तुम्हाला ही संधी देत आहे. बँकेकडून काही प्रॉपर्टीजचा लिलाव केला जाणार आहे.

नवी दिल्ली, 21 जुलै: तुम्ही देखील स्वस्त घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank- IOB) तुम्हाला ही संधी देत आहे. बँकेकडून काही प्रॉपर्टीजचा लिलाव केला जाणार आहे. बँकेकडून काही मालमत्तांचा ऑनलाइन लिलाव (E-Auction) केला जाणार आहे. हा लिलाव (IOB Mega E-Auction) 23 जुलै रोजी होणार आहे. या अंतर्गत गुंतवणुकदारांना प्लॉट, फ्लॅट, रहिवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता, औद्योगिक आणि कृषी मालमत्तांची खरेदी स्वस्तात करता येणार आहे. जाणून घ्या यामध्ये तुम्ही कशाप्रकारे सहभागी होऊ शकता.

कोणत्या दिवशी होणार आहे लिलाव?

बँकेकडून अशा प्रॉपर्टींचा लिलाव होणार आहे ज्या डिफॉल्ट लिस्टमध्ये आहेत. या प्रॉपर्टींचा लिलाव 23 जुलै, 17 ऑगस्ट आणि 15 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे. बँकेने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार यासंबंधातील अधिक माहिती https://www.iob.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

बोली लावणाऱ्यांसाठी अटी

>> रजिस्ट्रेशन- बिडरला त्याच्या मोबाइल क्रमांकावरुन आणि ईमेल आयडीचा वापर करून E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल

>>केवायसी व्हेरिफिकेशन- यानंतर बिडरला आवश्यक केवायसी कागदपत्र अपलोड करावी लागतील. ही कागदपत्र E-Auction सर्व्हिस प्रोव्हायडरकडून व्हेरिफाय केली जातील

हे वाचा-सावधान! आता नोकरीसाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी

>> EMD अमाउंट ट्रान्सफर- यानंतर E-Auction प्लॅटफॉर्म वर जनरेट झालेल्या चालानचा वापर करून तुम्हाला रक्कम भरावी लागेल. तुम्ही याकरता NEFT किंवा ऑनलाइन/ऑफ-लाइन ट्रान्सफरचा वापर करू शकता.

>> बिडिंग प्रक्रिया आणि लिलावाचा निकाल- इच्छुक बिडर्सनी पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर ते ई-ऑक्शन प्लॅटफॉर्वर बोली लावू शकतात.

बँकेकडून केला जातो लिलाव

बँक अशा मालमत्तांचा लिलाव करते ज्यांच्या मालकांनी बँकेकडून घेतलेलं कर्ज चुकवण्यात आलेलं नाही. त्या मालमत्तांवर घेतलेलं कर्ज जर काही कारणांमुळे त्यांना फेडता आलं नाही तर बँका ती मालमत्ता ताब्यात घेतात. बँकांकडून वेळोवेळी अशा मालमत्तांचा लिलाव केला जातो. या मालमत्ता विकून बँका त्यांची थकबाकी वसूल करतात.

First published:

Tags: Bank, Bank details, Home Loan, Investment, Money