मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rate Today: दिवाळीआधीच सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज गोल्ड 8330 रुपयांनी स्वस्त

Gold Rate Today: दिवाळीआधीच सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज गोल्ड 8330 रुपयांनी स्वस्त

आज सोन्याचे दर (Gold Rate Today) कमी झाले आहेत. बुधवारी मल्टी कमोडिटी (MCX) वर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.19 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर (Silver Rate Today) 0.44 टक्क्यांच्या घसरणीवर व्यवहार करत आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: दिवाळीआधी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सणासुदीचा काळ सुरू असून या काळात सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. अर्थात याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. असे असले तरी आज सोन्याचे दर (Gold Rate Today) कमी झाले आहेत. बुधवारी मल्टी कमोडिटी (MCX) वर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.19 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर (Silver Rate Today) 0.44 टक्क्यांच्या घसरणीवर व्यवहार करत आहेत.

काय आहे सोन्याचांदीचा भाव?

डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) 0.19 टक्क्यांनी घट झाली आहे. या घसरणीनंतर सोने  47,868 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात आज 0.44 टक्क्यांची घसरण (Silver Rate Today) झाली आहे. एमसीएक्सवर या घसरणीसह 64,648 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

रेकॉर्ड हायपेक्षा 8332 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

गेल्यावर्षी सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. गेल्यावर्षी एमसीएक्सवर ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर होते. आज डिसेंबरमधील डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत  47,868 रुपये प्रति तोळा आहे. यानुसार, सोन्याचे दर जवळपास 8332 रुपये प्रति तोळाने कमी आहेत.

हे वाचा-Shaktikanta Das आणखी तीन वर्षासाठी RBI चे गव्हर्नर, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

हे वाचा-SEBI चा मोठा निर्णय! या लोकांना करता येणार नाही ट्रेडिंग, वाचा निर्बंधाचं कारण

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today