मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, बुधवारी काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, बुधवारी काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट

भारतीय सराफा बाजारात आज 29 डिसेंबर रोजी (Gold rate Today 29 December 2021) सोन्याचा भाव उतरला आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा जास्त आहेत.

भारतीय सराफा बाजारात आज 29 डिसेंबर रोजी (Gold rate Today 29 December 2021) सोन्याचा भाव उतरला आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा जास्त आहेत.

भारतीय सराफा बाजारात आज 29 डिसेंबर रोजी (Gold rate Today 29 December 2021) सोन्याचा भाव उतरला आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा जास्त आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 29 डिसेंबर: भारतीय सराफा बाजारात आज 29 डिसेंबर रोजी (Gold rate Today 29 December 2021) सोन्याचा भाव उतरला आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा जास्त आहेत. आज चांदीच्या किंमतीतही (Silver price Today 29 December 2021) घसरण पाहायला मिळाली आहे. आज दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 216 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी 179 रुपयांनी उतरली आहे.

आज काय आहे सोन्याचा दर?

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 216 रुपयांनी कमी होऊन 47,010 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा भाव 47,226 रुपये प्रति पोहोचून बंद झाला होता.

हे वाचा-EPFO Updates: कुटुंबासाठी पूर्ण करा हे काम, EPFO मध्ये नॉमिनीचे काय आहेत फायदे

आज काय आहे चांदीचा दर?

दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदी 179 रुपयांच्या घसरणीनंतर  61,348 रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे. आधीच्या सत्रात चांदी 61,527 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती.

दरम्यान गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत (Gold Rates in Mumbai) 22 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चार शहरात काय आहेत सोन्याचे आजचे लेटेस्ट दर.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई49010 रुपये48220 रुपये
पुणे48,880 रुपये48,890 रुपये
नाशिक48,880 रुपये48,890 रुपये
नागपूर49010 रुपये48220 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई47010 रुपये47220 रुपये
पुणे46,360 रुपये46,370 रुपये
नाशिक46,360 रुपये46,370 रुपये
नागपूर47010 रुपये47220 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर

शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
मुंबई62500 रुपये62500 रुपये
पुणे62500 रुपये62500 रुपये
नाशिक62500 रुपये62500 रुपये
नागपूर62500 रुपये62500 रुपये

घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा-Income Tax विभागाचा करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत करता येईल हे काम

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price