नवी दिल्ली, 10 मार्च : रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार आणि कमॉडिटी मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. युद्धाचा जगभरात परिणाम होतो आहे. परंतु युद्धातून काही मार्ग निघत असल्याचं पाहता शेअर बाजारात काहीशी तेजी आहे. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) 911 रुपये स्वस्त झालं आहे. या घसरणीनंतर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) 1997 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानंतर चांदीचा भाव 68873 रुपये किलोग्रॅम आहे. इंडिया बुलियन्स असोसिएशनद्वारा गुरुवारी जारी केलेल्या रेटनुसार, आज 24 कॅरेटचा दर 52230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यावर 3 टक्के GST लावल्यानंतर हा भाव जवळपास 53796 रुपये होतो. चांदीच्या दर GST सह 70902 रुपये प्रति किलो आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव - 22 कॅरेट सोन्याचा भाव 47843 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 3 टक्के GST हा दर 49278 रुपये प्रति 10 ग्रॅम होतो. त्याशिवाय या रेटने नंतर दागिने बनवण्यासाठी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफाही वेगळा आहे.
हे वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार होळीची भेट! DA मध्ये वाढीची शक्यता
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. रशिया - युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक टाळत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठा कल आहे.
हे वाचा - तुम्हाला माहीत आहे का Car Loan वरही मिळते टॅक्स सूट? असा घेता येईल फायदा
कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.