मुंबई, 10 मार्च: कार किंवा गाडीला लक्झरी उत्पादन मानलं जातं. त्यामुळे सहाजिकच गाडीच्या लोनवर टॅक्स सूट (Tax Exemption) मिळत नाही. पण जर तुम्ही प्रोफेशनल आहात किंवा तुमच्या गाडीचा वापर व्यवसायासाठी करत असलात तर रिटर्न भरताना टॅक्सवर सूट मिळवण्यासाठी दावा करू शकता. नोकरदारांना मात्र या टॅक्सवर सूट मिळत नाही. क्लियर कंपनीचे फाउंडर आणि सीईओ अर्चित गुप्ता सांगतात की, जर तुम्हाला कार लोनच्या (Tax Car Loan) टॅक्सवर सूट मिळवण्यासाठी दावा करायचा असेल तर तुमची गाडी व्यवसायासाठीच वापरली जाणं आवश्यक आहे. जसं तुम्ही गाडी भाड्याने चालवण्यासाठी देत आहात. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये वापर होतोय किंवा व्यवसायासाठी स्वतः चालवत आहात. जर प्रोफेशनल असाल तर तुम्ही कार लोनवर वार्षिकरित्या आकारल्या जाणाऱ्या व्याजाएवढी टॅक्स सूट मिळवण्यासाठी दावा करू शकता. यासाठी व्याजाची रक्कम रिटर्न भरतेवेळी व्यवसायातील खर्च म्हणून दाखवावी लागेल. हे वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार होळीची भेट! DA मध्ये वाढीची शक्यता इंधन आणि मेंटेनन्सवरही सूट कार लोनच्या व्याजावरच नाही तर याच्यासाठी वर्षभर वापरलेल्या इंधन आणि कारच्या मेंटेनन्ससाठी झालेल्या खर्चावरही आयकर सूट मिळू शकते. याशिवाय कारच्या खरेदी मूल्यावर येणारी वार्षिक घट म्हणजेच डेप्रिसिएशन कॉस्टवरही तुम्ही सवलत मिळवू शकता. पण इंधनावर खर्च झालेल्या निश्चित रकमेवरच टॅक्सची सूट मिळते आणि डेप्रिसिएशन कॉस्टसुद्धा कारच्या मूल्याच्या 15-20% पर्यंत वार्षिक असायला हवी. समजून घ्या कॅलक्युलेशन समजा जर तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रूपये आहे आणि कार लोनसाठी बँकेला वर्षाला 70 हजार रूपये एवढं व्याज देत आहात तर आयकरची गणना 9.30 लाख रूपयांवर केली जाईल. यामध्ये इंधन आणि डेप्रिसिएशन कॉस्टचा समावेश होत नाही. या गोष्टींची काळजी घ्या » जर तुमच्या गाडीचा वापर व्यावसायिक उद्देशासाठी होत नसेल तर आयकर अधिकारी तुमचा क्लेम फेटाळू शकतात. » क्लेम करण्यासाठी बँकेकडून व्याज प्रमाणपत्र नक्की घ्या. आयकर विभाग ते पडताळणीसाठी मागू शकतो. » गाडीशी संबंधित व्यवसाय किंवा गाडीचा मालक म्हणून नोंदणी असणं आवश्यक आहे. हे वाचा- Tata च्या शेअरची कमाल, दोन वर्षात 1000% रिटर्न; तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर? क्लेम करताना घ्या ही काळजी टॅक्स आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन यांचं म्हणणं आहे की, टॅक्सपेयर्सनी हे लक्षात ठेवावं की, क्लेम करतेवेळी अधिकारी तुमची कारही व्यवसायासाठीच वापरली जाते, याचा पुरावा मागू शकतात. जर कोणी खोटा दावा केला असल्यास ना फक्त क्लेम फेटाळला जाईल तर आयकर विभागाकडून कारवाईही होऊ शकते. त्यामुळे रिटर्न भरतेवेळी करदात्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. मग तुम्हीही कार लोन घेतलं असेल आणि व्यवसायासाठी तिचा वापर करत असल्यास टॅक्सवर सूट मिळवू शकता. पण त्यासाठी वरील अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.