जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार होळीची भेट! DA मध्ये वाढीची शक्यता

7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार होळीची भेट! DA मध्ये वाढीची शक्यता

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळतो. 3 टक्क्यांच्या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्तीत जास्त 20,000 रुपये आणि किमान 6480 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    **मुंबई. 10 मार्च :**मोदी सरकार केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांना (Pensioners) होळीपूर्वी खूशखबर देऊ शकतं. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance - DA) 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 16 मार्च 22 रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्यानंतर डीए वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने महागाई भत्ता (DA Hike) आणि महागाई सवलत मिळेल. सध्या हा दर 31 टक्के आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. 16 मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतींबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मोदी सरकार 16 मार्च रोजी DA आणि DR वाढवण्याची घोषणा करू शकते. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार (7th Pay Commission), सरकार मूळ वेतनावर डीए ठरवते. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे केंद्र सरकार सध्या डीए वाढवण्याची घोषणा करत नाही आहे. मात्र, 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आचारसंहितेचे नियम संपतील, त्यानंतर सरकार घोषणा करू शकते, असं म्हटलं जातंय. आता महागाई भत्ता किती? सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळतो. 3 टक्क्यांच्या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्तीत जास्त 20,000 रुपये आणि किमान 6480 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. कर्मचार्‍यांचा डीए 34 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. AICPI च्या (All India Consumer Price Index for Industrial Workers) आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 पर्यंत DA 34.04% वर पोहोचला आहे. त्यामुळे या वेळी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार, असं या आकडेवारीवरून दिसतंय. 18,000 मूळ वेतनावर डीएमध्ये किती वाढ होईल? जर कर्मचार्‍याचे मूळ वेतन 18,000 रुपये प्रतिमहिना असेल, तर नवीन DA 34% झाल्यास 6120 रुपये प्रतिवर्ष जास्त मिळतील. आता 31% DA असल्याने 5580 रुपये मिळत आहेत. त्या व्यक्तीला मासिक पगारात दरमहा 540 रुपये जास्त मिळतील. 18 महिन्यांची डीए थकबाकी मिळण्याची शक्यता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा प्रलंबित डीए (DA) लवकरच देणार असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्याच्या (DA Arrears) थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. जर केंद्र सरकारनं 18 महिन्यांचा प्रलंबित डीए एकत्र दिला तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात