Home /News /money /

Gold Price Today: लग्नसराईत सोनंचांदी खरेदी करताय? त्याआधी वाचा काय आहे लेटेस्ट भाव

Gold Price Today: लग्नसराईत सोनंचांदी खरेदी करताय? त्याआधी वाचा काय आहे लेटेस्ट भाव

Gold Rate Today: सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनेखरेदीचा विचार (Investment in Gold) करत असाल तर त्याआधी जाणून घ्या काय आहेत सोनेचांदीचे लेटेस्ट दर.

    मुंबई, 11 जानेवारी: सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनेखरेदीचा विचार (Investment in Gold) करत असाल तर त्याआधी जाणून घ्या काय आहेत सोनेचांदीचे लेटेस्ट दर. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली तर चांदीही वधारली आहे. आज फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा दर  0.17 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात एमसीएक्सवर 0.23 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आज 48 हजारांपेक्षा कमी आहेत दर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात आज एमसीएक्सवर (Gold Rate on MCX) 0.17 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. या वाढीनंतर सोन्याचे दर 47,543 रुपये प्रति तोळावर व्यवहार करत आहेत. तर चांदीचे दर 0.23 टक्क्यांच्या तेजीनंतर 60,804 रुपये प्रति किलो या किमतीवर पोहोचले आहेत. हे वाचा-PNBच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार डबल, नसल्यास शुल्कही दुप्पट गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार महाराष्ट्रात (Gold and Silver Rate in Maharashtra) कमी झाले आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 120 रुपयांनी दर कमी होऊन 46490 रुपयांवर पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई48490 रुपये48610 रुपये
    पुणे48340 रुपये48350 रुपये
    नाशिक48340 रुपये48350 रुपये
    नागपूर48490 रुपये48610 रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
    शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई46490रुपये46610 रुपये
    पुणे45840 रुपये45850 रुपये
    नाशिक45840 रुपये45850 रुपये
    नागपूर46490रुपये46610 रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
    शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
    मुंबई60800 रुपये60400 रुपये
    पुणे60800 रुपये60400 रुपये
    नाशिक60800 रुपये60400 रुपये
    नागपूर60800 रुपये60400 रुपये
    2020 मध्ये सोन्याने पार केला होता 56 हजारांचा टप्पा ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर अर्थात 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. आज सोन्याचे दर 47,543 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात आता सोन्याचे दर जवळपास  8,666 रुपयांपेक्षा अधिक दराने स्वस्त आहेत. घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा-Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या