गुढीपाडव्याला सोनं खरेदीला अधिक महत्त्व आहे. हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याला महत्त्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यादिवशी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी पूजा केली जाते.
2/ 7
गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही बायकोला छोटासं सोन्याचं गिफ्ट देणार असाल किंवा तसा प्लॅन असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
3/ 7
तुम्ही गुढीपाडव्याला सोनं खरेदी करताना या चुका केल्या तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. ते टाळण्यासाठी या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवा.
4/ 7
22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या दागिन्यांचे दर तुम्ही आधीच चेक करा. याशिवाय मजुरी किती लावली जाते याची माहिती घेणंही आवश्यक आहे.
5/ 7
30 टक्के मेकिंग चार्ज आकारला जातो. मेकिंग चार्जेसचा सर्वाधिक फायदा ज्वेलर्सना होतो. त्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागते आणि नुकसान होतं.
6/ 7
नेहमी सोन्याचं पक्क बिल घ्या. त्याची शुद्धता योग्य वजन याचाही उल्लेख त्यामध्ये आहे की नाही ते तपासून घ्या
7/ 7
सर्वात महत्त्वाचं म्हणजे होलमार्किंग असलेले दागिनेच घ्या. होलमार्क बनावट नाही ना याची तपासणी केल्याशिवाय दागिना खरेदी करू नका.