जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold silver Price: सोनं महागलं तर चांदीतही झळाळी, काय आहे प्रति तोळा सोन्याचा लेटेस्ट रेट

Gold silver Price: सोनं महागलं तर चांदीतही झळाळी, काय आहे प्रति तोळा सोन्याचा लेटेस्ट रेट

Gold silver Price: सोनं महागलं तर चांदीतही झळाळी, काय आहे प्रति तोळा सोन्याचा लेटेस्ट रेट

भारतीय सराफा बाजारात आज 13 जानेवारी रोजी सोन्याचा दर (Gold Price Today 13 January 2022) वधारला आहे. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today 13 January 2022) उसळी पाहायला मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 जानेवारी: भारतीय सराफा बाजारात आज 13 जानेवारी रोजी सोन्याचा दर (Gold Price Today 13 January 2022) वधारला आहे. तर चांदीच्या दरातही  (Silver Price Today 13 January 2022) उसळी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचे दर 119 रुपयांनी वधारले आहेत. तर चांदीच्या किंमतीत 745 रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. काय आहे सोन्याचा दर? (Gold Rate Today) दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 119 रुपये प्रति तोळाने वाढून 46,919 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. सोन्याचे दर जरी वधारले असले तरी ते 47 हजारांपेक्षा कमीच आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी म्हणता येईल.  आधीच्या सत्रात सोन्याचे दर 46,800 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. काय आहे चांदीचा दर? (Silver Rate Today) दिल्लीतील सराफा बाजारात चांदीच्या दरात 745 रुपयांची वाढ पाहायला मिळाली, या वाढीनंतर दर  60,777 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर प्रति किलो 60,032 रुपयांवर होते. हे वाचा- Corona काळातही IT क्षेत्रात सुगीचे दिवस, ही दिग्गज कंपनी देणार 55 हजार नोकऱ्या मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा- Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात