मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Corona काळातही IT क्षेत्रात सुगीचे दिवस, ही दिग्गज कंपनी देणार 55 हजार नोकऱ्या

Corona काळातही IT क्षेत्रात सुगीचे दिवस, ही दिग्गज कंपनी देणार 55 हजार नोकऱ्या

टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) सारख्या मोठ्या कंपन्यांनी बुधवारी आपला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा अहवाल (October-December report) जाहीर केला. या तिन्ही कंपन्यांनी यंदा बक्कळ कमाई केली आहे.

टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) सारख्या मोठ्या कंपन्यांनी बुधवारी आपला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा अहवाल (October-December report) जाहीर केला. या तिन्ही कंपन्यांनी यंदा बक्कळ कमाई केली आहे.

टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) सारख्या मोठ्या कंपन्यांनी बुधवारी आपला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा अहवाल (October-December report) जाहीर केला. या तिन्ही कंपन्यांनी यंदा बक्कळ कमाई केली आहे.

मुंबई, 13 जानेवारी: कोरोना महामारीच्या काळामध्ये आयटी क्षेत्राला (IT Sector jobs) सुगीचे दिवस आले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेतील मोठा भाग या आयटी क्षेत्राचाच आहे. टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) सारख्या मोठ्या कंपन्यांनी बुधवारी आपला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा अहवाल (October-December report) जाहीर केला. या तिन्ही कंपन्यांनी यंदा बक्कळ कमाई केली आहे.

कंपन्यांच्या नफ्यामध्ये मोठी वाढ

2020-21 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये इन्फोसिसचा नेट प्रॉफिट (Infosys net profit) 5,197 कोटी रुपये होता; जो 2021 ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये वाढून 5,809 कोटी रुपये झाला. याचप्रमाणे, 2021-22 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये टीसीएसने (TCS net profit) 9,769 कोटी रुपये, तर विप्रोने 2,970 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट (Wipro net profit) मिळवला आहे.

हे वाचा-Gold-Silver Prices Today: किती घटले सोन्याचांदीचे दर? इथे वाचा लेटेस्ट किमती

महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली

आयटी क्षेत्र सध्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत आहे. कंपन्यांमध्ये महिलांची संख्याही (Female employees in IT companies) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इन्फोसिसने (Infosys total employees) दिलेल्या माहितीनुसार, 2020 वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,49,312 एवढी होती; जी 2021 मध्ये 2,92,067 एवढी झाली. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या 39.6 टक्के आहे. टीसीएसमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची (TCS total employees) संख्या 5,56,986 एवढी झाली आहे. यामध्ये दोन लाखांहून अधिक महिला कर्मचारी आहेत. तर विप्रोमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची (Wipro total employees) संख्या 2,31,671 झाली आहे.

इन्फोसिस देणार आणखी 55 हजार नोकऱ्या

विप्रोने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये त्यांनी तब्बल 41 हजार नव्या कर्मचाऱ्यांना भरती केले. तर दुसरीकडे इन्फोसिस देखील यंदाच्या आर्थिक वर्षात ग्लोबल हायरिंग प्रोग्रॅम (Infosys global hiring programme) अंतर्गत 55 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार आहे. कंपनीचे चीफ फायनॅन्शिअल ऑफिसर (Infosys CFO) नीलांजन रॉय यांनी याबाबत माहिती दिली. कंपनीचा टॅलेंट पूल वाढवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचा-मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारच्या 'या' निर्णयाचा 16.14 लाख घरांना फायदा

गुंतवणुकदारांचा आणि देशाचाही फायदा

या आयटी कंपन्या नफ्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या गुंतवणूकदारांचाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. टीसीएसने आपल्या शेअर होल्डर्सना (TCS share price) सात रुपये प्रति शेअर, तर विप्रोने (Wipro share price) एक रुपया प्रति शेअर नफा देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, कोरोना काळात इतर क्षेत्रांमधील व्यवहार ठप्प किंवा कमी झालेले असताना, आयटी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करताना दिसत आहे.

First published:

Tags: Job, Money, Tata group, जॉब