• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • फाटलेल्या नोटा घेऊन RBI त्याचं नेमकं काय करतं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फाटलेल्या नोटा घेऊन RBI त्याचं नेमकं काय करतं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दैनंदिन व्यवहारांसाठी आपण चलनी नोटा (Currency Notes) किंवा नाण्यांचा वापर करतो. अर्थात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांदरम्यान आपल्याला फाटक्या किंवा खराब झालेल्या नोटा (Teared Notes) मिळतात.

  • Share this:
मुंबई, 12 ऑक्टोबर : दैनंदिन व्यवहारांसाठी आपण चलनी नोटा (Currency Notes) किंवा नाण्यांचा वापर करतो. अर्थात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांदरम्यान आपल्याला फाटक्या किंवा खराब झालेल्या नोटा (Teared Notes) मिळतात. आर्थिक व्यवहार करताना एखाद्या वेळी तुमच्याकडे मर्यादित पैसे असतील आणि त्यातही फाटकी किंवा खराब नोट असेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. काही नोटांची अवस्था तर इतकी वाईट असते की त्या बदलून घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. नोटा या अनेक वर्षे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फिरत असतात. सातत्यानं हाताळल्यानं त्या खराब होतात किंवा फाटतात. मात्र अशा नोटा आपण बदलून घेतो किंवा व्यवहारादरम्यान त्यांचा वापर करतो. सध्या डिजिटल (Digital) व्यवहारांवर भर दिली जात असल्याने ही समस्या काही अंशी कमी झाली आहे. परंतु, अशा नोटांचं पुढं नेमकं काय होतं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) अशा नोटा परत घेत चलनातून बाद करते. पण मग यानंतर या नोटांचं काय होतं, असा तुमचा पुढचा प्रश्न असेल. भारतात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा, नाण्यांची निर्मिती आरबीआय करते. आरबीआयला 10 हजार रुपयांपर्यंत नोटा छपाई (Note Printing) करण्याची परवानगी आहे. परंतु, 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार हा भारत सरकारला (Indian Government) असतो. त्याशिवाय, केव्हा किती नोटा छापायच्या याची परवानगी देखील आरबीआयला भारत सरकारकडून घ्यावी लागते. मात्र, सरकार याबाबतचा निर्णय आरबीआयच्या सल्ल्यानंच घेते. प्रत्येक नोटेचं सरासरी आयुष्य (Life) ठरलेलं असतं. प्रिटींग करतेवेळी आरबीआयला याचा अंदाज असतो. नोटेची सेल्फ लाइफ (Self Life) पूर्ण झाल्यानंतर आरबीआय अशा नोटा परत घेते. बॅंकांच्या माध्यमातून फाटक्या, खराब झालेल्या नोटा एकत्रित केल्या जातात. त्यानंतर त्यांचे छोटे-छोटे तुकडे केले जातात. पूर्वी अशा नोटा जाळून नष्ट केल्या जात. मात्र यामुळे पर्यावरण प्रदूषित (Pollution) होत असल्यानं त्यावर आता पुर्नप्रक्रिया (Recycle) केली जाते. यात नोटांचे बारीक तुकडे करून, त्याच्यावर पुर्नप्रक्रिया करून विविध उत्पादनं तयार केली जातात. त्यानंतर नोटांच्या तुकड्यांपासून तयार केलेली ही उत्पादनं बाजारात विक्रीसाठी पाठवली जातात. अशा पध्दतीनं खराब, फाटक्या किंवा चलनातून बाद झालेल्या नोटा रिसायकल करून त्यापासून विविध उत्पादनं तयार होतात आणि ही उत्पादनं बाजारात विक्रीसाठी येतात. यामुळे पर्यावरण प्रदुषित होत नाही आणि खराब नोटांची योग्य मार्गाने विल्हेवाट लागते.
First published: