मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

LPG Gas Cylinder बुकिंगवर ही कंपनी देतेय 10000 रुपयांपर्यंत सोनं जिंकण्याची संधी, Paytm वरुन करावं लागेल बुकिंग

LPG Gas Cylinder बुकिंगवर ही कंपनी देतेय 10000 रुपयांपर्यंत सोनं जिंकण्याची संधी, Paytm वरुन करावं लागेल बुकिंग

नवरात्रीच्या मुहूर्तावर HP Gas ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोनं (Gold) जिंकण्याची संधी आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठीच लागू असेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : LPG Gas Cylinder च्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. पण गॅस सिलेंडरवरील एका ऑफरद्वारे मोठा फायदा घेता येईल. गॅस सिलेंडर बुकिंगवर 10000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवता येऊ शकतो. नवरात्रीच्या दिवसात एलपीजी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस लिमिटेडने (HPCL) आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर आणली आहे.

कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर HP Gas ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोनं (Gold) जिंकण्याची संधी आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठीच लागू असेल.

HPCL ने ट्विट करत सांगितलं, की या ऑफर अंतर्गत जे युजर्स ऑनलाइन पेमेंट सर्विस Paytm द्वारे गॅसचं बुकिंग करतील, त्यांना 10 हजार रुपयांपर्यंत गोल्ड जिंकण्याची संधी आहे. म्हणजेच सोनं जिंकण्यासाठी तुम्हाला Paytm द्वारे सिलेंडर बुक करावा लागेल.

LPG Gas Cylinder: सर्वसामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ; आजपासून नवे दर लागू

ही ऑफर 7 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर आहे. याचा फायदा काही दिवसच घेता येणार आहे. नवरात्री गोल्ड ऑफरअंतर्गत दररोज 5 लकी विनरची निवड केली जाईल.

Paytm बुकिंगवर मिळेल कॅशबॅक पॉइंट्स -

ही ऑफर गॅस सिलेंडर बुकिंग आणि त्यानंतर Paytm द्वारे पेमेंटवरच लागू आहे. युजर्सने पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुकिंग केल्यास, त्यांना इतरही फायदे मिळतील. युजर्सला प्रत्येक सिलेंडर बुकिंगवर 1000 रुपयांचे कॅशबॅक पॉइंट्स दिले जात आहेत.

दरम्यान, सरकारने LPG Gas Cylinder चे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. तेल कंपन्यांनी विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर मुंबईत घरगुती सिलेंडरचा दर 844.50 रुपयांनी वाढून 899.50 रुपये इतका झाला. हे नवे दर 6 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

First published:

Tags: Gas, LPG Price, Paytm, Paytm offers