मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनं? रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त

Gold Price Today: आज काय दराने खरेदी कराल सोनं? रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त

Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान (Planning to buy Gold) करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत.  दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX) डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.14% नी वाढली आहे. तर चांदीच्या दरात (silver price today) 0.48 टक्क्यांची  घसरण झाली आहे.

काय आहे सोन्याचांदीचा आजचा भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत 0.14% नी वाढून 46,892 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर  चांदीच्या दरात 0.48 टक्क्यांची  घसरण झाल्याने आजचा भाव  60,963 रुपये आहे.

महागाईचा फटका! Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST

9300 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 46,892 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज 9300 रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! BoB ने घटवले गृहकर्जावरील व्याजदर

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

First published: