मराठी बातम्या /बातम्या /मनी /

महागाईचा फटका! Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST

महागाईचा फटका! Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST

GST on Ice Cream: आइसक्रीम पार्लर किंवा आउटलेटमधून आइसक्रीम खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आइसक्रीम वरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

GST on Ice Cream: आइसक्रीम पार्लर किंवा आउटलेटमधून आइसक्रीम खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आइसक्रीम वरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

GST on Ice Cream: आइसक्रीम पार्लर किंवा आउटलेटमधून आइसक्रीम खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आइसक्रीम वरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

मुंबई, 07 ऑक्टोबर: आइसक्रीम आवडत नाही असं शोधूनही कोणी सापडणार नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आइसक्रीम आवडतं. एखादा आनंदाचा प्रसंग असो वा कोणत्याही गोष्टीचं सेलिब्रेशन, आइस्क्रीम हवंच. तुम्हीही आइसक्रीम प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता आइस्क्रीम खाणं खिशाला परवडणार नाही. आइसक्रीम खरेदी करणं आता महाग होणार आहे. आइसक्रीम पार्लर किंवा आउटलेटमधून आइसक्रीम खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आइसक्रीम वरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आइसक्रीम च्या किंमती वाढणार आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने (सीबीआयसी) म्हटलं आहे की, पार्लर किंवा आऊटलेटमधून विकल्या जाणाऱ्या आइसक्रीमवर जीएसटी (GST on Ice Cream) 18 टक्के लावण्यात येणार आहे. पूर्वी, पार्लरमध्ये विकल्या जाणाऱ्या आइसक्रीमवर 5 टक्के जीएसटी होता आणि बाहेर किरकोळ विकल्या जाणाऱ्या आइसक्रीमवर 18 टक्के जीएसटी होता. पण आता पार्लरमध्येही विकल्या जाणाऱ्या आइसक्रीमवरही 18 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! BoB ने घटवले गृहकर्जावरील व्याजदर

आइसक्रीम हे एक तयार झालेले उत्पादन आहे आणि ते सेवेत येत नाही. त्यामुळे आइसक्रीमवर 18 टक्के जीएसटी लागू होईल, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 17 सप्टेंबरला झालेल्य़ा जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत आइसक्रीमवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात, सीबीआयसीने काही परिपत्रके जारी केली आहेत. त्यापैकी 21 वस्तू आणि सेवांशी संबंधित दरामधील बदलांबाबत व्यापार आणि उद्योगांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यात आलं की याबाबतचा निर्णय 17 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या 45 व्या बैठकीत घेण्यात आला.

अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण

आइसक्रीमवर 18 टक्के जीएसटी का याबाबतचं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिलं आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितलं की, आइस्क्रीम विकणारे आइस्क्रीम पार्लर रेस्टॉरंट्ससारखे नाहीत. ते कोणत्याही टप्प्यावर स्वयंपाकाच्या कोणत्याही प्रकारात गुंतत नाहीत, तर रेस्टॉरंट सेवा देताना स्वयंपाकाच्या कामात गुंतलेली असते.

नवरात्रीनिमित्त वाचा आर्थिक नियोजनाची 9 पावलं, Financial Goal गाठण्यास होईल मदत

18 टक्के जीएसटी का?

तर सीबीआयसीने स्पष्ट केलं की, आइसक्रीमपार्लर आधीच तयार केलेले आइसक्रीम विकतात आणि ते रेस्टॉरंटमध्ये जसं पदार्थ तयार करून दिले जातात तसं आइसक्रीम तयार करून देत नाहीत. आइसक्रीम एक सेवा (Service) म्हणून नाही तर एक वस्तू म्हणून विकलं जातं. त्यामुळे त्यावर 18 टक्के कर लावण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आइस्क्रीमची दरवाढ होण्याचे संकेत सरकारने दिले होते. जीएसटी तसंच एक्साईज ड्यूटीमध्ये सूट दिलेल्या वस्तूंवर कर आकारण्याचा विचार असल्याचं या वेळी सरकारने म्हटलं होतं.

First published:

Tags: GST