मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदाने घटवले गृहकर्जावरील व्याजदर, वाचा सविस्तर

Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदाने घटवले गृहकर्जावरील व्याजदर, वाचा सविस्तर

सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर (Bank of Baroda cuts Home loan Interest Rate) कमी केले आहेत. तुम्ही देखील सणासुदीच्या काळात घरखरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: घर घेण्याचं स्वप्न आजही अनेक जण उराशी बाळगून आहेत. तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर (Bank of Baroda cuts Home loan Interest Rate) कमी केले आहेत. बँक ऑफ बडोदाने गुरुवारी गृह कर्जाच्या सुरुवातीच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात जाहीर केली. बँक आता 6.50 टक्के व्याज दराने गृहकर्ज देईल. 7 ऑक्टोबर 2021 पासून नवीन दर लागू झाले आहेत. हे दर 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू असतील. प्रोसेसिंग फी देखील 'झिरो' जे ग्राहक नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत, कर्ज हस्तांतरित करू इच्छितात किंवा त्यांच्या विद्यमान कर्ज रिफायनान्स करू इच्छितात त्यांच्यासाठी बँकेचे नवीन दर लागू होतील. तसेच, कर्ज घेणाऱ्यांना आणखी एक दिलासा म्हणजे गृहकर्जावरील शून्य प्रोसेसिंग शुल्काची ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता 'महाराजा'वर असणार TATA चा हक्क? Air India विक्रीबाबत सरकार उद्या करणार घोषणा बँक ऑफ बडोदाचे जीएम- मॉर्गेज अँड अदर रिटेल अॅसेट्स- एचटी सोलंकी म्हणाले की, बँक नेहमी कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज उत्पादनांवर सर्वाधिक स्पर्धात्मक व्याज दर देण्याचा प्रयत्न करते. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आमच्या समर्पित टीम्सच्या माध्यमातून ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय आणि त्रास-मुक्त करण्यात आली आहे'. YES बँकेनेही घटवले आहेत व्याजदर अलीकडेच, खासगी क्षेत्रातील येस बँकेने (YES Bank Home Loan Interest Rate) बँकेने गृहकर्ज ग्राहकांसाठी मर्यादित कालावधीच्या या विशेष ऑफर अंतर्गत केवळ 6.7 टक्के दर आकारला आहे. YES प्रीमियम होम लोन नावाच्या 90 दिवसांसाठी सुरू करण्यात आलेल्या या ऑफर अंतर्गत बँक 6.7 टक्के आरंभिक व्याज दराने होम लोन देत आहे. याशिवाय महिलांना कर्जावर 0.05 टक्के अतिरिक्त सूट दिली जाईल. महिलांसाठी गृहकर्जाचा व्याजदर 6.65 टक्क्यांपासून सुरू होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Bank details, Home Loan

    पुढील बातम्या