जाहिरात
मराठी बातम्या / मनी / विदेशी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, भारतात दिसेल असा परिणाम

विदेशी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, भारतात दिसेल असा परिणाम

विदेशी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, भारतात दिसेल असा परिणाम

सोन्याचांदीच्या किंमतीत मंगळवारी तेजी पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर आज ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 0.7 टक्क्यांनी वाढून 52,000 प्रति तोळावर पोहोचली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 सप्टेंबर : अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये (Dollar Index)झालेल्या घसरणीमुळे आणि अमेरिकन बाँडच्या यील्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे विदेशी बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाल्याचा पाहायला मिळत आहे. सोन्याचांदीच्या किंमतीत मंगळवारी तेजी पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर आज ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 0.7 टक्क्यांनी वाढून 52,000 प्रति तोळावर पोहोचली आहे. सलग तिसऱ्या व्यवहाराच्या सत्रात वायदे किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीची वायदे किंमत 1.2 टक्क्यांनी वाढून 71,000 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधीच्या सत्रात सोने 300 रुपये प्रति तोळा तर चांदी 1800 रुपये प्रति किलोने वाढली होती. तज्ज्ञांच्या मते विकसीत अर्थव्यवस्थांच्या आर्थिक आकडेवारीमध्ये आलेल्या कमजोरीमुळे सोन्याचांदीला मजबुती (Gold Silver Price Today) मिळाली आहे. (हे वाचा- देशातील दुसऱ्या मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका, गृहकर्ज होणार महाग) भारतात आज काय होईल? आज देशांतर्गत सराफा बाजारात देखील सोन्याच्या किंमती वाढू शकतात. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती 52,477 रुपये प्रति तोळाने वाढून 52,638 रुपये प्रति तोळा झाल्या होत्या. या दरम्यान सोन्याचे दर 161 रुपयांनी वाढले होते. मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर वाढून 51,405 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. 2 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मुल्य घसरल्यामुळे सोन्याच्या किंमती दोन आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. वृत्त संस्था Reuters च्या मते विदेशी बाजारात सोन्याचे दर 1,968.98 (Gold Spot Price) डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. (हे वाचा- मोठी बातमी! सप्टेंबर महिन्यात LPG घरगुती गॅसचे नवे भाव लागू, वाचा काय आहेत दर ) कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या कोरोना व्हायरस संक्रमणाच्या प्रकरणामुळे आणि अमेरिका-चीनमधी तणावामुळे सोन्याचे  दर वाढले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gold
  • First Published :
जाहिरात
जाहिरात