मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठी बातमी! सप्टेंबर महिन्यात LPG घरगुती गॅसचे नवे भाव लागू, वाचा काय आहेत दर

मोठी बातमी! सप्टेंबर महिन्यात LPG घरगुती गॅसचे नवे भाव लागू, वाचा काय आहेत दर

ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder Price 01 September 2020) च्या किंमतीत सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC)एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder Price 01 September 2020) च्या किंमतीत सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC)एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत, काही शहरात किंमती कमी झाल्या आहेत. IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या किंमती आहेत. दिल्लीमध्ये तर 19 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 2 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. (हे वाचा-आजपासून सामान्य माणसासाठी बदलणार या 6 गोष्टी, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम) याआधी जुलै महिन्यात 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारण 4 रुपयांपर्यंत वाढली होती. जून महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या एलपीजी सिलेंडरची किंमत 11.50 रुपयांनी वाढली होती. मे मध्ये एलपीजी स्वस्त झाला होता. काय आहेत नवे दर (LPG Price in India 01 September 2020) देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओसी (IOC) च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या किंमतीनुसार दिल्लीमध्ये सिलेंडरच्या किंमती स्थीर आहेत. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये जे भाव होते तेच याही महिन्यात आहेत. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. मुंबईमध्ये या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. चेन्नईमध्ये ही किंमत 50 पैशांनी कमी होऊन प्रति सिलेंडर 610 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 14.2 किलो घरगुती गॅसच्या किंमती 50 पैसे प्रति सिलेंडर वाढल्या आहेत. 19 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत -दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत 2 रुपयांनी कमी होऊन 1133.50 रुपये झाली आहे. -मुंबईमध्ये ही किंमत 1091 रुपये प्रति सिलेंडरवरून 1089 रुपये झाली आहे. -कोलकातामध्ये ही किंमत 1198.50 रुपये प्रति सिलेंडरवरून 1196.50रुपये झाली आहे. -चेन्नईमध्ये ही किंमत 1253 रुपये प्रति सिलेंडरवरून 1250 रुपये झाली आहे.
First published:

पुढील बातम्या