जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सणासुदीत सोनंखरेदीचा गोल्डन चान्स! 10582 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं; तपासा आजचा भाव

Gold Price Today: सणासुदीत सोनंखरेदीचा गोल्डन चान्स! 10582 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं; तपासा आजचा भाव

Gold Price Today: सणासुदीत सोनंखरेदीचा गोल्डन चान्स! 10582 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं; तपासा आजचा भाव

Gold Silver Price, 6 October 2021: सोन्याच्या दरात बुधवारी घसरण झाली आहे. तर चांदीचे दरही उतरल्याचं आढळून आलं. तज्ज्ञांच्या मते मजबूत डॉलरमुळे सोन्याचे दर कमी किंमतीच्या पातळीवर पोहोचले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today 06 October 2021) 06 ऑक्टोबर 2021 रोजी कमी झाले आहेत. यामुळे सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10500 पेक्षाही अधिक फरकाने कमी आहेत. सोन्याचे दर आजच्या घसरणीनंतर 46 हजारांपेक्षा कमी आहेत. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates Today) 45,844 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर (Silver Rates Today) 59,80.3 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. मात्र चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही. सोन्याचा आजचा भाव दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 226 रुपये प्रति रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,618 रुपये  प्रति तोळावर पोहोचले आहेत. यानंतर सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा जवळपास 10582 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्या तुलनेत सोन्याचे दर 10582 रुपयांनी स्वस्त आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी होऊन 1,747 डॉलर प्रति औंस या स्तरावर आहेत. वाचा- तुम्हाला आलाय हा SMS किंवा ईमेल तर वेळीच व्हा सावध! बुडेल तुमच्या कष्टाची कमाई चांदीचा आजचा भाव चांदीच्या किंमतीत देखील आज घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरात 462 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 59,341 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. याठिकाणी चांदीचे दर 22.35 डॉलर प्रति औंस आहेत. वाचा- डोनाल्ड ट्रम्प आता ‘तेवढे’ श्रीमंत राहिले नाहीत, FORBES च्या यादीतून बाहेर का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, भारतीय रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत 54 पैशांनी कमी झाली आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये  74.98च्या खालच्या स्तरावर बंद झाला आहे. रुपयाच्या या घसरणीचा सोन्यातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आणि त्याचे भाव कमी झाले आहेच. त्याचबरोबर, अमेरिकन बॉण्ड यील्डमधील उसळीचा परिणामही सोन्याच्या किमतीवर झालाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात