Home /News /videsh /

डोनाल्ड ट्रम्प आता ‘तेवढे’ श्रीमंत राहिले नाहीत, 25 वर्षांत पहिल्यांदाच FORBES च्या यादीतून बाहेर

डोनाल्ड ट्रम्प आता ‘तेवढे’ श्रीमंत राहिले नाहीत, 25 वर्षांत पहिल्यांदाच FORBES च्या यादीतून बाहेर

donald trump

donald trump

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump form the list of rich people by Forbes) गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

    वॉशिंग्टन, 6 ऑक्टोबर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump form the list of rich people by Forbes) गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. फोर्ब्सनं दिलेल्या (First time in 25 years trump out of list) माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प श्रीमंतांच्या यादीत नसण्याची घटना गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच घडत आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगांना जबरदस्त फटका बसल्याचा हा परिणाम असल्याचंही फोर्ब्स मासिकानं म्हटलं आहे. कमी झाली संपत्ती रिअल इस्ट्रेट क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या दोन तपांपासून श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव राखून आहेत. मात्र यंदा ते 400 अमेरिकी नागरिकांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ट्रम्प यांची संपत्ती 250 कोटी डॉलर म्हणजेच 1,86,52,50,00,000 कोटी रुपये एवढी आहे. मात्र गेल्या वर्षभरात त्यंना 40 कोटी डॉलरचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती भारतीय चलनानुसार 9,84,40,00,000 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे ते श्रीमंतांच्या 400 जणांच्या यादीतून नाव गमावून बसले आहेत. मासिकातील एका रिपोर्टनुसार 2016 सालच्या अमेरिकीतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांना त्यांची काही संपत्ती विकण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही संपत्ती विकून ती रक्कम ब्रॉड बेस्ड इंडेक्समध्ये गुंतवावी, अशी कल्पना त्यांना संघीय अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र ट्रम्प यांनी संपत्ती विकायला नकार देत ती आपल्याच नावावर असेल, असं जाहीर केलं होतं. याच निर्णयाचा ट्रम्प यांना फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा - अफगाणिस्तानात चोरीची भयंकर तालिबानी शिक्षा, 3 चोरांना गोळी मारुन लटकवलं JCB ला कोरोना काळात बसला फटका रिअल इस्टेट हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाकाळात मोठा फटका बसला. अलिशान घरं ही लक्झरी मानली जाते. त्याशिवाय, गुंतवणुकीचं साधन म्हणूनदेखील नागरिक त्याकडे पाहतात. मात्र कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या  गेल्यामुळे आणि व्यवसाय बुडाल्यामुळे रिअल क्षेत्रात मंदीची लाट निर्माण झाली होती. त्याचाच फटका ट्रम्प यांना बसला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Donald Trump, Rich World

    पुढील बातम्या