नवी दिल्ली, 24 डिसेंबर: या आठवड्यात सलग दोन दिवस सोन्याचांदीचे दर कमी झाल्यानंतर गुरुवारी आज पुन्हा एकदा दरात वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 24 डिसेंबर 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 385 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1000 पेक्षा अधिक दराने वाढ झाली आहे. गुरुवारी एक किलो चांदीच्या किंमतीत (Silver Rates Today) 1102 रुपयांची वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सोन्याचे दर 49,239 रुपये प्रति तोळावर ट्रेड करणं बंद झालं होतं, तर चांदी 65,852 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती.
तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले आहे, शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबतीत वाढलेली अनिश्चितता हे देखील सोन्याचांदीचे दर वाढण्याचे एक कारण आहे.
(हे वाचा-PM-KISAN: उद्या येणार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये, तपासा तुमचं नाव)
सोन्याचे नवे दर (Gold Price on 24th December 2020)
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 385 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,624 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 49,239 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर किरकोळ स्वरुपात वाढले आहेत. या वाढीनंतर 1,878 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
चांदीचे नवे दर (Silver Price on 24nd December 2020)
सोन्याप्रमाणेच गुरुवारी चांदीमध्येही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीचे दर 1102 रुपयांनी वधारले आहेत. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 66,954 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market)चांदीचे भाव 25.80 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते
(हे वाचा-RBI चा ग्राहकांना इशारा! हे Apps वापरून सहज कर्ज मिळवण्याचा विचार करत असाल तर..)
का वधारले सोन्याचांंदीचे दर?
एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरमध्ये घसरण झाली आहे. परिणामी सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळते आहे. त्यातच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संंपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अधिकतर देशांनी ब्रिटनशी सध्या संपर्क तोडला आहे आणि ब्रिटनमधून जाण्यायेण्याच्या प्रवासावर बंदी आणली आहे. अधिकतर देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या जाणाऱ्या विमानसेवेवर बंदी आणली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, जी ही भीती आणि चिंता वाढली तर सोन्याचांदीचे दरही भविष्यात आणखी वाढू शकतात.