Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 51 हजारांपेक्षा जास्त, चांदी 70 हजारांपार

Gold Price Today: घसरण होऊनही सोन्याचे दर 51 हजारांपेक्षा जास्त, चांदी 70 हजारांपार

Gold Silver Price, 6 January 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरा मौल्यवान धातू असणाऱ्या चांदीचे दर मात्र बुधवारी वधारले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जानेवारी: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरा मौल्यवान धातू असणाऱ्या चांदीचे दर मात्र बुधवारी वधारले आहेत. भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात घट होऊनही दर 51 हजारांपेक्षा जास्त असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांची चिंता वाढली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 06 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 71 रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या किंमतीत झालेली ही किरकोळ घसरण सोन्याच्या किंमतीवर फारसा परिणाम करू शकली नाही. परिणामी दर 51 हजारांच्या वर आहेत. चांदीच्या दरात (Silver Price Today) आज 156 रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 51,196 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदीचे दर 69,926 रुपये प्रति किग्रा होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर स्थीर आहेत.

सोन्याचे नवे भाव (Gold Price on 06th January 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोनं प्रति तोळा 71 रुपयांनी किरकोळ दराने कमी झालं आहे. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51,125 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 51,196 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,949 डॉलर प्रति औंस आहेत.

(हे वाचा-LPG जाहिरातीच्या नावाखाली 10 कोटींची लूट, बिहारी टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश)

चांदीचे नवे भाव (Silver Price on 06th January 2021)

बुधवारी देखील चांदीमध्ये वाढ पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरांत किरकोळ 156 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 70,082 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे भाव 69,926 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव  27.54 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.

(हे वाचा-भाड्याच्या घरात राहत असल्यास आयकरामध्ये मिळेल सूट, जाणून घ्या कसा होईल फायदा)

का कमी झाले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल (कमोडिटीज) यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती स्थीर राहुनही देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 3 पैशांनी वाढ होऊन कमी होऊन 73.14 रुपयांवर पोहोचला आहे. यामुळेच सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 6, 2021, 6:29 PM IST

ताज्या बातम्या