नवी दिल्ली, 06 जानेवारी: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने (Income Tax Department) आयटी रिटर्न भरण्याची तारीख 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आयकरात बचत (Income Tax Saving) करण्याची तुमच्याकडे आणखी संधी आहे. परंतु आयकर रिटर्न भरताना छोट्याच्या चुकीमुळे तुम्हाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) ज्या व्यक्तींच्या फाईलचे ऑडिट होते त्यांच्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली असून ज्यांचे ऑडिट (Audit) होत नाही त्यांना 10 जानेवारीपर्यंत ITR दाखल करायचा आहे. तुम्ही यामध्ये विविध पद्धतीने कर वाचवू शकता. भाड्याच्या रकमेवर तुम्ही HRA अंतर्गत मोठी सूट मिळवू शकता. जाणून घ्या याकरता तुम्हाला काय करावे लागेल.
यामध्ये आयकर विभागाने (Income Tax Department) असेसमेंट ईयर 2020-21 साठी फॉर्म 16 ला ITR-1 बरोबर जोडलेला आहे. यामुळे तुम्हाला आयकर फाईल करणे सोपे जाणार आहे. आयकर कायद्याच्या कलम 10 (13 ए) अंतर्गत काही मर्यादांनुसार एचआरएवर आयकर सूट मिळू शकते. एचआरएअंतर्गत मिळालेल्या रकमेवर कर सूट ज्या व्यक्तीच्या पगारामध्ये घरभाडे भत्ता असेल आणि तो भाड्याच्या घरात राहत असेल त्यालाच घेता येणार आहे.महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कंपनी HRA चा लाभ देत असेल तरच तुम्ही आयकरामध्ये याचा लाभ घेत सूट मिळवू शकता. स्वतःच्या घरात राहत असाल तर तुम्ही या HRA मार्फत आयकरामधे सूट मिळवू शकत नाही.
(हे वाचा-PNB Scam: नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या; बहिण पूर्वी मोदी सरकारी साक्षीदार बनणार)
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला आयकरात सूट नाही
नोकरपेशा व्यक्तीलाच या योजनेतून आयकरात सूट मिळू शकते. व्यवसाय करणारा व्यक्ती यामध्ये आयकरात सूट मिळवू शकत नाही. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कंपनी HRA चा लाभ देत असेल तरच तुम्ही आयकरामध्ये याचा लाभ घेत सूट मिळवू शकता. टॅक्समधून सूट मिळण्यासाठी नोकरी करणारी व्यक्ती आईवडिलांना देखील घरभाडं देऊ शकते आण एचआरएमध्ये (HRA) आयकरात सूट मिळवू शकते. आयकर विभागाच्या कायद्यांतर्गत आई वडिलांच्या घरी राहत असलेला व्यक्ती एचआरएमध्ये आयकरात सूट मिळवू शकतो. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आई वडिलांना ही बाब त्यांच्या आयकरामध्ये दाखवावी लागणार आहे.
(हे वाचा-घरातील सोन्यावर व्याज मिळवण्याची संधी, सरकार या योजनेत बदल करण्याच्या तयारीत)
HRA वर किती सूट मिळते?
आयकर कायद्याच्या कलम 10 (13 ए) अंतर्गत काही मर्यादांनुसार एचआरएवर आयकर सूट मिळू शकते. एचआरएअंतर्गत मिळालेल्या रकमेवर कर सूट ज्या व्यक्तीच्या पगारामध्ये घरभाडे भत्ता असेल आणि तो भाड्याच्या घरात राहत असेल त्यालाच घेता येणार आहे. प्रत्येक वर्षी कंपनीने ठरवलेल्या तारखेच्या आत व्यक्तीला भाड्याच्या रकमेच्या पावत्या जमा कराव्या लागतात. मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीला 50 टक्के तर छोट्र्या शहरांमध्ये 40 टक्के सूट या योजनेअंतर्गत मिळू शकते. याचबरोबर एकूण कमाईच्या 10 टक्के घरभाडे तुम्ही वर्षभरात भरले तर तुम्हाला देखील यावर सूट मिळू शकते. याचबरोबर वर्षाला तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम भाड्याच्या रूपात दिले असतील तर तुम्हाला घरमालकाचा पॅनकार्ड नंबर देणे बंधनकारक आहे.
या पद्धतीने मिळवा HRA वर टॅक्समधे सूट
तुमच्या मालकीचे स्वतःचे घर आहे परंतु तुम्हीच कामानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा त्याच शहरात भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला भाड्याच्या रूपात आयकरामध्ये सूट मिळणार आहे. यासाठी कंपनीकडून तुम्हाला HRA मिळायला हवा. याचबरोबर घराच्या हफ्त्यासाठी भरणाऱ्या रकमेवर देखील तुम्ही आयकर विभागाच्या सेक्शन 24E अंतर्गत सूट मिळवू शकता. याचबरोबर HRA अंतर्गत सेक्शन 80GG मधून भाड्याच्या रकमेवर देखील आयकरामधे सूट मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax