दर महिन्याला मिळेल 12,500 रुपयांची स्काॅलरशिप, मोदी सरकारची योजना

दर महिन्याला मिळेल 12,500 रुपयांची स्काॅलरशिप, मोदी सरकारची योजना

Modi Government's scholarship - तुम्ही बुद्धिमान असाल तर सरकार तुम्हाला दर महिन्याला स्काॅलरशिप देईल

  • Share this:

मुंबई, 20 जून : तुम्ही बुद्धिमान आहात तर मग कितीही आर्थिक संकट आलं तरीही तुमचं शिक्षण थांबणार नाही. हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाता आलं पाहिजे म्हणून मोदी सरकार स्काॅलरशिप देतेय. मनुष्य बळ विकास मंत्रालय तंत्रज्ञान शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 12,500 रुपये स्काॅलरशिप देतेय.

ही स्काॅलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना GATE किंवा GPAT उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. GATE किंवा GPAT उत्तीर्ण विद्यार्थी जे AICTEकडून मान्यता असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये मास्टर डिग्री मिळवण्यासाठी प्रवेश घेत असतील ते या स्काॅलरशिपसाठी आॅनलाइन अर्ज करू शकतात. M. Tech, M.E., M.Arch किंवा M.Pharma इथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप मिळू शकते.

पोस्ट ऑफिसच्या या 2 योजनांमध्ये गुंतवा पैसे, बँक FD पेक्षा जास्त फायदा

कोणाला मिळणार स्काॅलरशिप?

सरकार तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना प्रोत्साहन देतंय. दर वर्षी या क्षेत्रात मास्टर डिगरीसाठी प्रवेश घेणाऱ्यांना ही स्काॅलरशिप मिळू शकते. यासाठी आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतो.

यात्रा मंगलमय हो ! आता दिल्ली-मुंबई रेल्वेचा प्रवास फक्त 10 तासांत

GATE/GPAT करून अॅडमिशन घेणाऱ्यांना स्काॅलरशिप मिळू शकते. प्रवेश घेतल्यानंतर GATE/GPAT परीक्षा दिली तर स्काॅलरशिप मिळणार नाही.

Life In लोकल-काळ्या- पांढऱ्या कपड्यांकडे पाहून पोरांनी दुसऱ्या दारातून उडी टाकली

ज्यांना ही स्काॅलरशिप मिळते त्यांना शिक्षण सुरू असेपर्यंत दुसरी आर्थिक मदत, दुसऱ्या प्रकारची स्काॅलरशिप घेता येणार नाही.

परदेशी विद्यार्थी किंवा मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणाऱ्यांना ही स्काॅलरशिप मिळणार नाही.

स्काॅलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून कमीत कमी 8 ते 10 तास शिकवण्यासंबंधी काम किंवा रिसर्च करावा लागेल. हे काम त्यांना इन्स्टिट्युट देईल.

12,500 रुपयांची स्काॅलरशिप दर महिन्याला मिळेल. त्यासाठी संस्थेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी वेळोवेळी तपासली जाईल. चांगलं काम करणाऱ्यांची स्काॅलरशिप सुरू राहील.

स्काॅलरशिप जास्तीत जास्त 24 महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दिली जाईल.

तर रद्द होऊ शकते स्काॅलरशिप

विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केलं तर स्काॅलरशिप रद्द होऊ शकते.

विद्यार्थ्यांना 15 दिवसांची CL, 30 दिवसांची मेडिकल लिव्ह मिळू शकते. मॅटर्निटी लिव्ह सरकारी नियमांप्रमाणे मिळेल.

यात काही बदल झाला तर तो पोर्टलवर कळवला जाईल.

VIDEO : लालबागच्या राजाचा पाद्मपूजन सोहळा, आदित्य ठाकरे होते हजर

First published: June 20, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading