नवी दिल्ली, 1 मार्च : सोने-चांदी दरात आज तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) एप्रिलचा फ्यूचर ट्रेड 382 रुपयांच्या वाढीसह 46,118 रुपयांवर पोहचला आहे. त्याशिवाय चांदीचा मार्चमधील फ्यूचर ट्रेड 889 रुपयांच्या तेजीसह 68,150 रुपयांवर आहे. दरम्यान सोने दरात गेल्या आठ महिन्यातील निच्चांकी स्तरावरून आता काहीशी रिकव्हरी पाहायला मिळत आहे.
त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात आज तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यवसाय 15.95 डॉलरच्या वाढीसह 1,750.17 डॉलर प्रति औंस रेटवर बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीही 0.21 डॉलरच्या वाढीसह 26.89 डॉलरच्या लेवलवर आहे.
दिल्लीत 1 मार्च 2021 रोजी सोने-चांदी दर -
> 22 कॅरेट गोल्ड रेट - 44810 रुपये
>> 24 कॅरेट सोन्याचा भाव - 48910 रुपये
>> चांदीचा दर - 67510 रुपये
आतापर्यंत 11000 रुपये स्वस्त झालं सोनं -
दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा दर (Gold Prices) 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वाच्च स्तरावर बंद झाला होता. तेव्हापासून या मौल्यवान धातूच्या किंमतीत शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत 11,409 रुपयांची घसरण झाली आहे.
तर चांदीचा दर 7 ऑगस्ट 2020 रोजी 77,840 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आता शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत चांदीचा भाव 10,421 रुपयांनी कमी होवून 67,419 रुपयांवर पोहचला आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये सोने दरात पुन्हा वाढ होऊ शकते. एकदा सोने दरात वाढ सुरू झाल्यास हा सोन्याचा दर सध्याच्या किंमतीवरुन 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.