LPG Gas Cylinder: सामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ; 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

LPG Gas Cylinder: सामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ; 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG cylinder Price Hike) वाढल्या आहेत. LPG cylinder च्या किंमतीत सोमवारी 25 रुपयांची वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मार्च : वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG cylinder Price Hike) वाढल्या आहेत. LPG cylinder च्या किंमतीत सोमवारी 25 रुपयांची वाढ झाली आहे. आठवडाभरात दोन वेळा घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी 4 तारखेला 25 रुपये, 14 तारखेला 50 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅसच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. केवळ तीन दिवसांत आधीच्या किंमतीच्या 25 रुपये वाढले आहेत. डिसेंबरमध्ये 50 रुपये अशी दोन वेळा वाढ करण्यात आली होती. म्हणजेच डिसेंबरपासून आतापर्यंत LPG cylinder चे दर जवळपास 200 रुपयांपर्यंत महागले आहेत.

14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी (non-subsidized LPG) आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह दिल्लीत आता घरगुती गॅस सिंलेडर 794 वरून 819 रुपये इतका झाला आहे.

>>दिल्लीत गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती 819 रुपये

>>मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 819 रुपये

>>कोलकातामध्ये 845.50 रुपये

>>चेन्नईत 835 रुपये

LPG गॅसच्या किंमती गेल्या दोन महिन्यांपासून सतत वाढत्या आहेत. जानेवारीमध्ये ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नव्हते. डिसेंबरमध्ये 50 रुपये अशी दोन वेळा वाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली. एकट्या फेब्रुवारी महिन्यात एकूण 100 रुपये गॅस सिंलेडर वाढ झाली.

Published by: Karishma Bhurke
First published: March 1, 2021, 12:05 PM IST
Tags: LPG Price

ताज्या बातम्या