मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरातलं सोनं तुम्हाला मिळवून देईल दुप्पट कमाई, जाणून घ्या काय आहे योजना

घरातलं सोनं तुम्हाला मिळवून देईल दुप्पट कमाई, जाणून घ्या काय आहे योजना

सरकारने एक अशी योजना सुरु केली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सोन्याच्या वाढत्या दरापासून नफा होईलच आणि अतिरिक्त कमाई सुद्धा होईल. केंद्र सरकारने (Indian Government) गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme) सुरु केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 1मार्च : कोरोनाच्या संकटामध्ये सोन्याचे (Gold) दर मोठ्याप्रमाणात वाढले होते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांचा सोनं खरेदीकडे कल कमी आहे. दर वाढल्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करु शकत नसाल, पण तुमच्या घरामध्ये पडून असलेले सोनं तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतं. तसंच, तुम्ही सोन्याच्या वाढत्या किंमतीपासून ही पैसे कमवू शकता.

सरकारने एक अशी योजना सुरु केली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सोन्याच्या वाढत्या दरापासून नफा होईलच आणि अतिरिक्त कमाई सुद्धा होईल. केंद्र सरकारने (Indian Government) गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचं सोनं जमा करावं लागेल आणि यावर तुम्हाला बँकेकडून व्याज मिळेल. तसंच तुम्ही काही कालावधीनंतर गरज पडल्यावर हे जमा केलेले सोनं परत काढू शकता.

दरम्यान, सरकारने गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमशी संबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत जमा करण्याचे सोन्याचे किमान प्रमाण 30 ग्रॅमवरुन कमी करत 10 ग्रॅम केलं आहे. त्यासोबतच सरकारने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारनं आता गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये ज्वेलर्सला सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकासुद्धा या योजनेत सहभागी होतील.

काही काळासाठी सोनं जमा करावं लागेल

या योजनेअंतर्गत मध्यम मुदतीसाठी 5 ते 7 वर्षे आणि दीर्घ मुदतीसाठी 12 वर्षे सोनं बँकेत ठेवू शकता. या योजनेसंदर्भात विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे येणं अद्याप बाकी आहे. अशामध्ये तुम्ही 5 वर्षांनंतरही सोनं परत घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, या योजनेत जेव्हा सोनं परत मिळतं तेव्हा ते दागिन्याच्या रुपात नसतं. तुमचं सोनं वितळवून ते तुम्हाला सोन्याच्या बिस्किट किंवा नाण्याच्या स्वरुपात दिलं जाईल. या योजनेमध्ये सरकार तुमचे दागिने वितळवून त्या सोन्याचा वापर अर्थव्यवस्थेत करते आणि याच्या बदल्यात तुम्हाला व्याज मिळते. त्यानंतर दागिन्यांच्या वजनाएवढं सोनं तुम्हाला काही वर्षांनंतर परत दिलं जातं.

लॉकर घ्यायची गरज नाही

या योजनेअंतर्गत तुम्ही घराच्या तिजोरीमध्ये पडून असलेले सोनं बँकेत जमा करुन त्यावर व्याज मिळवू शकता. या योजनेची खास गोष्ट म्हणजे आपलं सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला बँकेत लॉकर घेण्याची आवश्यकता नाही. तुमचं सोनं बँक स्वत:च सांभाळून ठेवेल आणि त्यावर तुम्हाला व्याजदेखील देईल.

कोणत्या स्वरुपात व्याज मिळेल?

एमटीजीडी आणि एलटीजीडीमध्ये तत्कालीन सोन्याच्या किंमतीनुसार रक्कम दिली जाते किंवा सोन्याच्या किंमती एवढीच रक्कम भारतीय रुपयांमध्ये दिली जाते. स्टेट बँकेच्या (SBI) म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत जमा केलेल्या सोन्यावर व्याज त्या तारखेपासून सुरु होतं जेव्हा जमा केलेल्या सोन्याला साफ केल्यानंतर व्यवहार करण्यायोग्य सोन्याच्या रुपात रूपांतरित केलं जातं.

First published: