नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: धनत्रयोदशीपूर्वी (Dhantrayodashi 2021) सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सणासुदीचा काळ सुरू असून या काळात सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. अर्थात याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. असे असले तरी आज सोन्याचे दर (Gold Rate Today) कमी झाले आहेत. बुधवारी मल्टी कमोडिटी (MCX) वर सोन्याच्या किमतीत 0.10 टक्क्यांनी घट झाली आहे. या घसरणीनंतर सोने 47,765 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात वाढ (Silver Rate Today) झाली आहे. एमसीएक्सवर चांदी 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 65050 रुपयांवर व्यवहार करत आहे. ऑक्टोबर 2020 नुसार गेल्या वर्षावर नजर टाकली तर सध्या तरी सोने 4 हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे. गेल्या वर्षी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत या दिवशी 51,079 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,765 रुपये आहे. अशा स्थितीत अजूनही 3,314 रुपये विक्रमी पातळीपेक्षा स्वस्त विकले जात आहेत. वाचा- दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, वाचा 8 दिवसांत किती मिळेल नफा? 50000 रुपयांवर पोहोचणार दर सोन्याच्या सध्याच्या किमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची (Investment in Gold) की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या खरेदीबाबत अशीच तीव्र भावना कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात तुम्ही सध्याच्या किंमतीवर सोनं खरेदी केल्यास, तुम्ही प्रत्येक 10 ग्रॅमसाठी 2,500 रुपयांपेक्षा जास्त कमावू शकता. वाचा- एक-दोन नव्हे तर 7 आयपीओ येणार बाजारात! Policybazaar-Paytm सह मिळेल कमाईची संधी सोन्याच्या किंमतीत का होईल वाढ? डॉलरच्या कमजोरीमुळे अलीकडच्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीचा परिणामही सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. भारतात कोरोना महामारीनंतर सोन्याच्या आयातीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्याचबरोबर स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे भाव वाढत आहेत. जागतिक ट्रेंडचा फायदाही सोन्याला मिळत आहे. शिवाय यूएस ट्रेजरी बाँड्सचे उत्पन्न वाढणे देखील सोन्याच्या किमतीला आधार देत आहे. त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीचा देखील सपोर्ट सोन्याला मिळतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.