... म्हणून दागिन्यांच्या उद्योगाला मंदीचा फटका, हजारो नोकऱ्या संकटात

Gold, Gem - दागिन्यांच्या उद्योगात मंदी सुरू झालीय. जाणून घ्या त्याची कारणं

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 01:45 PM IST

... म्हणून दागिन्यांच्या उद्योगाला मंदीचा फटका, हजारो नोकऱ्या संकटात

मुंबई, 10 सप्टेंबर : अखिल भारतीय रत्न आणि आभूषण घरगुती परिषदेनं  (Gem and Jewellery Domestic Council -GJC) सांगितलं की, दागिन्यांच्या उद्योगातही मंदी आहे. लोक दागिन्यांची खरेदी कमी करतायत. याचा परिणाम लोकांच्या नोकरीवर होतोय. कुशल कारागिरांच्या रोजगारावर यामुळे संकट येऊ शकतं. ज्वेलरी सेक्टरला मंदीपासून वाचवण्यासाठी आयात करण्यात येणाऱ्या सोन्यावरचं सीमा शुल्क कमी करण्याची मागणी काउन्सिलनं केलीय.

पूर्ण बजेट 2019-20मध्ये इम्पोर्टेड सोन्यावरचं सीमा शुल्क 10 टक्के वाढवून 12.5 टक्के केलं होतं. दागिन्यांवरचा सेवा कर (GST) 3 टक्के केला.

सावधान! पैशाच्या देवाण-घेवाणीचे 'हे' 7 कडक नियम मोडलेत तर नक्की येईल नोटीस

Gem and Jewellery Domestic Council चे अध्यक्ष शंकर सेन यांनी सांगितलं की मागणी कमी झाल्यानं दागिन्यांच्या उद्योगात मंदी सुरू आहे. यामुळे हजारो कुशल कारागिरांचा रोजगार बंद होण्याच्या वाटेवर आहे. GJC नं मागणी केलीय की, या क्षेत्रातल्या 55 लाख नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारनं गोल्ड पाॅलिसीत मोठे बदल करावेत. सेन यांनी सांगितलं की पॅन कार्डवरच्या खरेदीची मर्यादा 2 लाखावरून 5 लाख करायला हवी.

14 दिवसांनी वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, 'हे' आहेत आजचे दर

Loading...

एकीकडे सोन्या-चांदीच्या किमतीत रोजच चढउतार पाहायला मिळतायत.आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. काल  दिल्लीत सोन्याच्या किमतीत 300 रुपयांची घट झालीय. यामुळे आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत 39,225 रुपये झालीय. तज्ज्ञांच्या मते मजबूत झालेला रुपया आणि सोन्याची मागणी कमी झाल्यानं ही घसरण झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं  1,506 डाॅलर प्रति औंस आहे. तर चांदी 18.05 डाॅलर प्रति औंस आहे.

सावधान, 24 सप्टेंबरला तुमच्या PF बद्दल होऊ शकतो मोठा निर्णय

दिल्लीत 99.9 टक्के सोनं 300 रुपयांनी कमी झालंय. सोन्याच्या घसरणीबरोबर चांदीही घसरलीय. चांदीमध्ये 1400 रुपयांची घट झालीय. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 48,500 रुपये झालीय. सिक्का कारभाऱ्यांमध्ये लिवाली कमी झाल्यानं चांदी घसरलीय.

VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Sep 10, 2019 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...