मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: लग्नसराईत सोनंखरेदी ठरणार महाग, आज पुन्हा वाढला सोन्याचांदीचा भाव

Gold Price Today: लग्नसराईत सोनंखरेदी ठरणार महाग, आज पुन्हा वाढला सोन्याचांदीचा भाव

Gold Price on 6th April 2021: सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढले आहेत.

Gold Price on 6th April 2021: सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढले आहेत.

Gold Price on 6th April 2021: सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढले आहेत.

नवी दिल्ली, 06 एप्रिल: भारतीय बाजारात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर (Gold Price Today) कमी झाले होते, मात्र आज पुन्हा दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील सराफा बाजारात 6 एप्रिल 2021 रोजी सोन्याचे दर किरकोळ वाढले आहेत. मात्र या वाढीमुळे सोन्याचा भाव 45 हजारांवर गेला आहे. तर चांदीच्या किंमतीतही आज तेजी पाहायला मिळाली. आधीच्या सत्रात सोन्याचे भाव 44,966 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे भाव (Silver Price Today)  64,588 रुपये प्रति किग्रा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज (International Markets) सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. तर चांदीचे भाव स्थीर होते.

सोन्याचे नवे दर (Gold Price, 6th April 2021)

दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 83 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे अर्थात 24 कॅरेट सोन्याचे दर 45,049 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधी सोन्याचे दर 44,966 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज वाढून 1,733 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

(हे वाचा-बँक ऑफ बडोदाने पासवर्डबाबत दिला आहे महत्त्वाचा ALERT! हे रंग लक्षात ठेवणं आवश्यक)

चांदीचे नवे दर (Silver Price, 6th April 2021)

चांदीच्या किंमतीत देखील आज तेजी पाहायला मिळाली. चांदीचे दर आज 62 रुपये प्रति तोळा या किरकोळ दराने वाढले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी या वाढीनंतर चांदीचे दर 64,650 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले आहेत. याआधीच्या सत्रात चांदीचे दर 64,588 रुपये प्रति किग्रा वर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर स्थीर होते. याठिकाणी चांदीचे दर 24.97 डॉलर प्रति औंस आहेत.

(हे वाचा-SBI चा कोट्यवधी ग्राहकांना झटका! घर खरेदी झाली महाग, वाचा किती वाढला तुमचा EMI)

का वाढले सोन्याचे भाव?

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउताराचा परिणाम देशांतर्गंत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण आणि कमजोर डॉलरमुळे सोन्याच्या किंमतींना पाठिंबा मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond, Silver, The gold