मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँक ऑफ बडोदाने पासवर्डबाबत दिला आहे महत्त्वाचा ALERT! हे रंग लक्षात ठेवणं आवश्यक

बँक ऑफ बडोदाने पासवर्डबाबत दिला आहे महत्त्वाचा ALERT! हे रंग लक्षात ठेवणं आवश्यक

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदानं (Bank Of Baroda) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेने याबाबत ट्वीट केलं आहे. बँकेने डेबिट, क्रेडिट किंवा एटीएम कार्ड तसंच ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पासवर्ड आणि विशिष्ट रंग याबाबत ही सूचना दिली आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 06 एप्रिल: आजकाल बँकांचे (Bank) सर्व व्यवहारही ऑनलाइन झाले आहेत. पूर्वीसारखे आता प्रत्येक गोष्टीला बँकेत जावे लागत नाही. पैसे काढायचे असतील तर एटीएम (ATM) केंद्रं दिमतीला हजर आहेत. डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) यांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करणं सहजसोपं झालं आहे. बँकेत न जाता घरबसल्या मोबाइलवरूनही आता अनेक कामं करता येतात. सध्या कोरोना काळात या सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. फक्त यासाठी पासवर्ड (Password) आणि पिननंबर लक्षात ठेवणं महत्त्वाचं असते. त्याचप्रमाणे पासवर्ड, पिन नंबर सुरक्षित करणंही अत्यावश्यक असते. दरम्यान या बाबतीत बँक ऑफ बडोदानं (Bank Of Baroda) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेने याबाबत ट्वीट केलं आहे. बँकेने डेबिट, क्रेडिट किंवा एटीएम कार्ड तसंच ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पासवर्ड आणि विशिष्ट रंग याबाबत ही सूचना दिली आहे. तुमचा पासवर्ड किती सुरक्षित आहे, याची सूचना हिरवा, पिवळा आणि लाल हे रंग देतात. असं बँकेनं ट्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान सर्वच बँकांच्या बाबतीत ही रंगाची सूचना लागू होते. (हे वाचा-या सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर करा हे काम, महत्त्वाची सेवा होईल बंद) बँकेच्या सूचनेनुसार, ग्राहकांनी दिलेल्या पासवर्डला हिरवा रंग (Green Color) आला तर तो पासवर्ड अत्यंत सुरक्षित असतो. पिवळा रंग (Yellow Color) आल्यास त्याची सुरक्षितता मध्यम असते, तर लाल रंग (Red Color) आल्यास तो पासवर्ड फारसा सुरक्षित नाही, असा याचा अर्थ होतो. ग्राहकांनी सुरक्षित पासवर्डसाठी कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही प्रकारातील अक्षरे, स्पेशल कॅरेक्टर्स आणि आकडे यांचा समावेश करून पासवर्ड तयार करावा. हिरवा रंग आल्यास पासवर्ड अधिक सुरक्षित बँकेनं सांगितल्याप्रमाणे पासवर्ड तयार केल्यावर हिरवा रंग आल्यास तो अतिशय सुरक्षित आहे, असा याचा अर्थ होतो. कुणीही सहजासहजी हा पासवर्ड हॅक करू शकणार नाही. लाल रंग आल्यास तो पासवर्ड अगदी सोपा असल्यानं कोणीही सहज हॅक करू शकेल. तसेच पिवळा रंग आल्यास पासवर्डची सुरक्षा मध्यम स्वरूपाची आहे, असा अर्थ होतो. लाल आणि पिवळा रंग आल्यास दोन्ही पासवर्डसमधील कॅरेक्टर्समध्ये बदल करून तो अधिक कठीण करणं आवश्यक आहे. तर त्याची सुरक्षितता अधिक चांगली होईल. सहजासहजी कोणालाही तो हॅक करता येणार नाही. (हे वाचा-Gold Price Today: 11000 रुपयांनी स्वस्त झाली सोनेखरेदी, वाचा घसरणीनंतरचा भाव) बँकेनं सुरू केली नवी सुविधा बँक ऑफ बडोदानं आपल्या ग्राहकांसाठी आता एक नवीन सेवा उपलब्ध केली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना व्हॉटसअॅपवर (What’s app) आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाइलवरून बँकेच्या 8433888777 या मोबाइल नंबरवर हाय (Hi) असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर व्हॉटसअॅप चॅटच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या बँक खात्याबाबत हवी असलेली माहिती मिळेल.
First published:

Tags: Bank, Money

पुढील बातम्या