सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या किंमतीत झाली मोठी घसरण

सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या किंमतीत झाली मोठी घसरण

गुंतवणूकदारांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल कमी झाला आहे. शेअर बाजारातही तेजी आहे. त्यामुळे सोन्याचे भाव घसरले.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती घसरल्याने घरगुती बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. मागणी कमी झाल्याने चांदीच्या किंमती 700 रुपयांनी (Silver Price Today) घसरल्या आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी एक तोळा सोन्याचे भाव (Gold Prices) 112 रुपयांनी कमी झाले. चांदीचे भाव(Silver Prices) 108 रुपये प्रतिकिलोने कमी झालेत.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 12th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 41 हजार 148 रुपये प्रतितोळा झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 562.5 डॉलर प्रति औंस आणि चांदीची किंमत 17.51 डॉलर प्रति औंस झाली.

चांदीचे नवे दर

चांदीला मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 46 हजार 360 रुपये प्रति किलो झाली.

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अ‍ॅनॅलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, गुंतवणूकदारांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल कमी झाला आहे. शेअर बाजारातही तेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचे भाव घसरले.

(हेही वाचा : देशातल्या 3 बड्या इन्शुरन्स कंपन्यांचं विलिनीकरण, ग्राहकांवर काय होणार परिणाम?)

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

1. तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

2. IBJA द्वारे ठरलेले दर देशात सर्वमान्य असतात. असं असलं तरी या रेट्समध्ये 3 टक्के GST नसतो.

3. असली सोनं 24 कॅरेटचं असतं पण त्याचे दागिने बनत नाहीत कारण ते मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरट सोनं वापरलं जातं. यामध्ये 91. 66 टक्के सोनं असतं.

(हेही वाचा : तुमचा PF खात्यातून काढण्याचे नियम बदलले,आता घरबसल्या अपडेट करा 'Date of Exit')

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

========================================================================

First published: February 12, 2020, 6:44 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या