Home /News /money /

तुमचा PF खात्यातून काढण्याचे नियम बदलले,आता घरबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

तुमचा PF खात्यातून काढण्याचे नियम बदलले,आता घरबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना EPFO ने नोकरादारांना प्रॉव्हिडंट फंडाबद्दल दिलासा दिला आहे. PF बद्दलचे नियम त्यांनी सोपे केले आहेत.

  नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना EPFO ने नोकरादारांना प्रॉव्हिडंट फंडाबद्दल दिलासा दिला आहे. PF बद्दलचे नियम त्यांनी सोपे केले आहेत. याआधी नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करेपर्यंत PF अडकून पडत होता. आता कर्मचारी कंपनी सोडण्याची तारीख स्वत:च अपडेट करू शकतात. यासाठी युनिफाइड पोर्टलवर एक नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती कोणत्यातरी कंपनीमध्ये काम सुरू करते तेव्हा तिच्या बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम पगारातून कापली जाते आणि तेवढीच रक्कम कंपनीतर्फे दिली जाते. EPFO ने आपल्या खातेधारकांसाठी एक ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. यामध्ये कर्मचारी नोकरी सोडण्याची तारीख स्वत: अपडेट करू शकतात.

  (हेही वाचा : एका 'आयडिया' मुळे बनले करोडपती, 10 श्रीमंत लोकांमध्ये पोहोचले सहाव्या स्थानावर)

  नियम बदलल्याचा फायदा तज्ज्ञांच्या मते, आधी नोकरी सोडण्याची तारीख कंपनीचे प्रतिनिधीही अपडेट करू शकत होते. EPFO च्या रेकॉर्डमध्ये नोकरी सोडण्याच्या तारखेची नोंद केली नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून पैसे काढूही शकत नाहीत किंवा ट्रान्सफरही करू शकत नाहीत. (हेही वाचा :  पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, आज 5 महिन्यातील सर्वात कमी दर) EPFO मध्ये कशी भराल Exit Date ? कर्मचाऱ्यांना ही तारीख ई सेवा पोर्टलमध्ये जाऊन अपडेट करावी लागेल. सगळ्यात आधी तुमचा UAN पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून ई सेवा पोर्टलवर लॉग इन करावं लागेल. यामध्ये 'मार्क एक्झिट' या पर्यायावर क्लिक करा. यात तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावावर क्लिक करून एक्झिट डेट टाकू शकता. ==================================================================================
  Published by:Arti Kulkarni
  First published:

  Tags: Money, PF Amount

  पुढील बातम्या