जाहिरात
मराठी बातम्या / मनी / देशातल्या 3 बड्या इन्शुरन्स कंपन्यांचं विलिनीकरण, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

देशातल्या 3 बड्या इन्शुरन्स कंपन्यांचं विलिनीकरण, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

देशातल्या 3 बड्या इन्शुरन्स कंपन्यांचं विलिनीकरण, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

मोदी सरकारने देशातल्या 3 बड्या सरकारी इन्शुरन्स कंपन्यांच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी या तिन्ही कंपन्यांची मिळून एक कंपनी बनेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : मोदी सरकारने देशातल्या 3 बड्या सरकारी इन्शुरन्स कंपन्यांच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी (National Insurance Company), युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी(United India Insurance Company) आणि ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी (Oriental India Insurance Company)या तिन्ही कंपन्यांची मिळून एक कंपनी बनेल. ही कंपनी देशातली सर्वात मोठी जनरल इन्शुरन्स कंपनी असेल. ग्राहकांवर काय होणार परिणाम? तज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांना पॉलिसीवर मिळणारे फायदे तसेच राहतील. त्याचबरोबर त्यांना मिळणाऱ्या सुविधाही मिळत राहतील. नॅशनल इन्शुरन्स कंपनी विम्यासोबत ज्या सुविधा देते त्या सुविधा विलिनीकरणानंतरही मिळत राहतील. यामुळेच या विलिनीकरणामुळे ग्राहकांचं कोणतंही नुकसान होणार नाही. त्याचबरोबर विमा कंपन्यांच्या शाखा कमी करण्यात येणार नाहीत. या कंपन्यांकडे एकत्रितपणे 9 हजार 243 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 44 हजार आहे. (हेही वाचा : तुमचा PF खात्यातून काढण्याचे नियम बदलले,आता घरबसल्या अपडेट करा ‘Date of Exit’) हे कर्मचारी देशभरातल्या 6,000 हून अधिक कार्यालयांमध्ये काम करतात.3 विमा कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर तयार झालेली कंपनी देशातली सर्वात मोठी विमा कंपनी बनेल.या कंपनीची एकूण किंमत सव्वालाख ते दीड लाख रुपये होईल. (हेही वाचा : एका ‘आयडिया’ मुळे बनले करोडपती, 10 श्रीमंत लोकांमध्ये पोहोचले सहाव्या स्थानावर) 200 पेक्षा जास्त इन्शुरन्स प्रॉडक्ट या तिन्ही इन्शुरन्स कंपन्यांची बाजारात 200 हून जास्त इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आहेत. सरकारी विमा कंपन्यांच्या सुमारे 8 हजार शाखा आहेत. या कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या वेळी सरकार या तिन्ही कंपन्यांना 12 हजार 500 कोटी रुपये देणार आहे. =========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात