मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today : सोनं-चांदीची खरेदी झाली स्वस्त पण पाकिस्तानमध्ये सोनं महागलं

Gold Price Today : सोनं-चांदीची खरेदी झाली स्वस्त पण पाकिस्तानमध्ये सोनं महागलं

घरगुती बाजारात घसरलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या किंमती यामुळे सोनंखरेदी स्वस्त झाली आहे.

घरगुती बाजारात घसरलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या किंमती यामुळे सोनंखरेदी स्वस्त झाली आहे.

घरगुती बाजारात घसरलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या किंमती यामुळे सोनंखरेदी स्वस्त झाली आहे.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : घरगुती बाजारात घसरलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या किंमती यामुळे सोनंखरेदी (Gold Price Today)स्वस्त झाली आहे. सराफा बाजारात एक तोळा सोन्याच्या किंमतीत 222 रुपयांची घसरण झालीय. औद्योगिक मागणी घटल्याचा परिणाम चांदीच्या किंमतींवर झाला आहे. एक किलो चांदीचे दर 60 रुपयांनी कमी झालेत. त्याचवेळी मागच्या 3 दिवसांत सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 28th February 2020)

राजधानी दिल्लीत सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 43 हजार 358 रुपये झालीय.

चांदीचे नवे दर (Silver Price on 28th February 2020)

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही घसरण झालीय. चांदीचा दर 48 हजार 130 रुपयांवर आलाय.

आता पुढे काय?

HDFC सिक्युरिटीज के सीनियर अॅनॅलिस्ट (कमोटिडीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती घटल्याने सोन्यावर त्याचा दबाव आलाय. पुढच्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता नाही.

(हेही वाचा : भारतीय तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी उभी केली 71 हजार कोटींची कंपनी)

पाकिस्तानात सोनं महागलं

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन न्यूजच्या वेबसाइटवर दिलेल्या आकड्यांनुसार पाकिस्तानच्या कराची शहरात 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 80 हजार 976 पाकिस्तानी रुपये झालीय. याच वजनाच्या चांदीची किंमत 874 पाकिस्तानी रुपये आहे.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

(हेही वाचा : आता तुम्हाला मिळू शकते सरकारी नोकरी… ‘या’ 5 जागांसाठी आजच भरा अर्ज)

===============================================================================

First published:

Tags: Gold, Money