मुंबई, 26 फेब्रुवारी: सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक, वैज्ञानिक, इंजिनिअर आणि ड्रायव्हर यासह विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे.
1. MSC Bank Recruitment 2020: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेत सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. बॅंकेत 164 पदांकरिता जाहिरात निघाली आहे. यामध्ये क्लार्क पदांकरता 103 जागा असणार आहेत. ऑफिसर ग्रेड (ट्रेनी) पदांसाठी 47 तर जूनियर ऑफिसरसाठी (ट्रेनी) 12 जागांवर भरती होणार आहे. यामध्ये संयुक्त प्रबंधक (ट्रेनी) पदासाठी 2 जागा रिक्त आहेत.
या पदांकरता 16 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी 21 ते 40 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथं क्लिक करा. Notification MSC Bank Trainee Officer Clerk
2. इंडियन ऑयलमध्ये 500 पदांकरता भरती: इंडियन ऑयलमध्ये 500 जागांकरता भरती होणार आहे. 18 ते 24 वयोगटातील तरूण याकरता अर्ज करू शकतात. याकरता 20 मार्चपर्यंत अंतिम अर्ज भरता येणार आहेत.यासाठी https://www.iocl.com/ इथं क्लिक करा.
इतर बातम्या:Job Alert: 10वी पास असणाऱ्यांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
3.वैज्ञानिक आणि टेक्निकल असिस्टंट भरती: नेशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एंड इंफार्मेशन टेक्नोलॉजी लिमिटेड (National Institute of Electronics and Information Technology) ने वैज्ञानिक आणि टेक्निकल असिस्टंट पदांसाठी 495 जागांवर भरती होणार आहे. यासाठी 26 फेंब्रुवारी आणि 26 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे.या आठवड्यापासून वैज्ञानिक’B’ या पदांसाठी 288 जागा तर टेक्निकल असिस्टेंट ‘A’ या पदाकरता 207 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या पदांकरता 30 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी https://www.calicut.nielit.in/nic/ इथं क्लिक करा.
इतर बातम्या:SSC Board Exam : परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी करू नका या चुका