Success Story : भारतीय तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी उभी केली 71 हजार कोटींची कंपनी

Success Story : भारतीय तरुणाने वयाच्या 24 व्या वर्षी उभी केली 71 हजार कोटींची कंपनी

सध्या 24 वर्षांचा असलेल्या रितेशची संपत्ती जवळपास 8 हजार कोटी इतकी आहे. आयआयएम, आयआयटी, एचबीएस आणि आयव्ही लीगमध्ये शिकलेल्या लोकांची टीम आता रितेशसोबत काम करते.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : वयाच्या 17 व्या वर्षी त्याने इंजिनिअरिंग सोडलं आणि एक कंपनी सुरु केली. आज त्याच कंपनीची उलाढाल 71 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रितेश अगरवालनं कोणाच्याही मदतीशिवाय ओयो रूम्सची सुरुवात केली होती. आता त्यानं हुरुन रिच लिस्ट 2020 मध्ये स्थान पटकावलं आहे. सध्या फक्त 24 वर्षांच्या असलेल्या रितेशची संपत्ती जवळपास 8 हजार कोटी इतकी आहे. रितेसच्या ओयो रुम्स देशातील सर्वात यशस्वी इंटरनेट कंपन्यांपैकी एक आहे. फ्लिपकार्ट, पेटीएमनंतर ओयोचा तिसरा क्रमांक लागतो. ही देशातील सर्वात मोठी हॉटेल चेनसुद्धा आहे.

रितेशला फिरण्याची आवड होती. त्यातच तो 2009 मध्ये डेहराडून आणि मसूरीला गेला. त्यावेळी अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत ज्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे. या अनुभवातून त्याला प्रेरणा मिळाली आणि एक ऑनलाइन सोशल मीडिया कम्युनिटी तयार करण्याचा विचार त्यानं केला.

एकाच प्लॅटफॉर्मवर पर्यटकांना बेड आणि ब्रेकफास्ट सुविधा कमी किंमतीत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने त्यानं पाऊल टाकलं. याची सुरुवात रितेशने 2011 मध्ये केली. त्यानं ओरावेलची स्थापना केली. रितेशच्या या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी मनीष सिन्हा यांनी गुंतवणूक केली.

ओरावेलला 2012 मध्ये आर्थिक आधार मिळाला. दरम्यान त्याला अनेक अडथळे पार करावे लागले. आर्थिक पाठबळ उभा करणं, मार्केटिंग, ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या तिथल्या लोकांपर्यंत आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहचण्याचं आव्हान होतं. रितेशनं ओरावेल डॉट कॉमची सुरुवात केली तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. त्यामागे देशातील सर्व पर्यटकांना स्वस्तात राहण्याची सोय व्हावी हा उद्देश होता.

ओरावेल एक असं मार्केट आहे जिथं 3500 पेक्षा जास्त अपार्टमेंट आणि रुम्सची यादी उपलब्ध असते. त्यातून तुम्हाला ज्या भागात जायचं आहे तिथली तुम्हाला परवडेल अशी सेवा मिळू शकते. कंपनीमार्फत ओयो इन्स हॉटेल्स चालवली जातात. कमी किंमतीची हॉटेल्सची ही एक साखळी आहे.

वाचा : राधाकिशन दमानी बनले भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती, दिग्गजांना टाकलं मागे

ओडिसातील एका लहानशा शहरात रितेशचा जन्म झाला. नक्षलग्रस्त अशा भागातून आलेला रितेश कॉलेजमधून ड्रॉप आउट झाला. पण त्यानंतर खचून न जाता त्यानं जोमानं काम केलं. लहानपणापासून बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ज आणि मार्क झुकेरबर्ग हे त्याचे आदर्श राहिले आहेत.

वाचा : जानेवारी महिन्यात त्याने दररोज कमावले 3 हजार कोटी रुपये, बेजोसलासुद्धा जमलं नाही

आयआयएम, आयआयटी, एचबीएस आणि आयव्ही लीगमध्ये शिकलेल्या लोकांची टीम आता रितेशसोबत काम करते. कॉलेज ड्रॉपआऊट होऊन अशा लोकांसोबत आज तो काम करतो. भारतात कॉलेज ड्रॉपआउटची खिल्ली उडवली जाते आणि आशा आहे की पुढच्या काही वर्षांत कॉलेजमधून ड्रॉप आउट झालेले अनेकजण यशस्वी झालेले दिसतील.

वाचा : बाबा गेल्यानंतर शिक्षणासाठी दमडी नव्हती, सायकलचं पंक्चर काढणारा आज झाले IAS

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: india
First Published: Feb 28, 2020 10:35 PM IST

ताज्या बातम्या