सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त

रुपया मजबूत झाल्यामुळे घरगुती बाजारात सोनं आणि चांदी स्वस्त झालं आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन सोन्याची खरेदी करायला हरकत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी : रुपया मजबूत झाल्यामुळे घरगुती बाजारात सोनं आणि चांदी (Gold and Silver Prices Today)स्वस्त झालं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 51 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्याचवेळी कमी मागणीमुळे चांदीच्या किंमती 472 रुपयांनी घसरल्या आहेत. अमेरिका आणि चीनमधला व्यापारविषयक करार आणि जगभरातल्या शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे आहे. त्याचमुळे सोन्याच्या दरात घसरण झालीय.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 22st January)

दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 40 हजार 688 रुपयांवर आले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 555 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीची किंमत 17. 80 डॉलर प्रतिऔंस झाली.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 22st January)

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झालीय. चांदीचे भाव 47 हजार 285 रुपये प्रतिकिलो झालेत.

(हेही वाचा : PF च्या नियमांत होणार मोठा बदल, तुम्हाला होणार फायदा)

का स्वस्त झालं सोनं-चांदी? (Gold Silver Price Down)

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अ‍ॅनॅलिस्ट (कमोडिटीज)तपन पटेल यांच्या मते, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोनं आणि चांदी स्वस्त झालंय. कच्च्या तेलांच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात तेजी आलीय. त्यामुळे रुपया मजबूत झालाय.

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

1. तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

2. IBJA द्वारे ठरलेले दर देशात सर्वमान्य असतात. असं असलं तरी या रेट्समध्ये 3 टक्के GST नसतो.

3. असली सोनं 24 कॅरेटचं असतं पण त्याचे दागिने बनत नाहीत कारण ते मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरट सोनं वापरलं जातं. यामध्ये 91. 66 टक्के सोनं असतं.

(हेही वाचा : इनकम टॅक्समध्ये होऊ शकतो मोठा बदल! मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी)

===================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Jan 22, 2020 05:07 PM IST

ताज्या बातम्या